Grahan In Pitru Paksha 2025 saam tv
राशिभविष्य

Grahan In Pitru Paksha: पितृ पक्षात चंद्र-सूर्य ग्रहणाचा होणार अद्भुत संयोग; 4 राशींना मिळणार मनाजोग्या गोष्टी

Grahan In Pitru Paksha 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहणांना एक विशेष महत्त्व आहे. यंदाचा पितृ पक्ष ज्योतिषीय दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे. कारण, या वर्षी पितृ पक्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन महत्त्वपूर्ण ग्रहण लागणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना आठवून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण करण्याचा काळ असतो. या वर्षी पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू होऊन २१ सप्टेंबरला संपणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी पितृपक्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी ग्रहण लागणार आहे.

७ सप्टेंबरला वर्षातील शेवटचा चंद्रग्रहण असेल, तर २१ सप्टेंबरला सूर्यग्रहण आहे. हा दुर्मीळ संयोग ४ राशींच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकणार आहे. करिअरपासून ते आर्थिक स्थितीपर्यंत मोठे बदल आणि प्रगती दिसून येणार आहे. या काळात कोणत्या राशींना लाभ होणार आहे पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांना या काळात व्यवसायात चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. थोड्याफार प्रवासाच्या संधी येणार आहेत. नवीन संधी मिळतील, पैशाचे मार्ग खुले होतील आणि बचत करण्यातही यश मिळणार आहे. लेखन किंवा प्रकाशन क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ होणार आहे. भावंडांकडून पाठबळ मिळू शकतं.

तूळ रास

तुला राशीच्या व्यक्तींना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. कार्यक्षेत्रात आवडतं काम करण्याची संधी मिळणार आहे. सरकारी नोकरीत असलेल्यांना बदलीसारख्या इच्छित बदलाची संधी मिळू शकते. काळ अनुकूल राहील आणि यशस्वी होण्यासाठी संधी मिळणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी या काळात आनंदाचे दरवाजे उघडणार आहे. कमी मेहनतीत जास्त यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कुटुंबातील वातावरण पूर्वीपेक्षा सुखकर होणार आहे आणि नातेवाईकांचा आधार मिळेल. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांना नोकरीत नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. व्यवसाय सुरू करण्याची योजना असेल तर ती पुढे नेण्यासाठी योग्य वेळ आहे. जुन्या ओळखींतून मोठा फायदा होऊ शकणार आहे. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल आणि मन प्रसन्न राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टचा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश.

C. P. Radhakrishnan यांनी दिला राज्यपालपदाचा राजीनामा, बनले भारताचे नवे उपराष्ट्रपती

Dead Snake In Ration Rice: बापरे! रेशनच्या तांदळात आढळला मेलेला साप; चार दिवस खाल्ल्यानंतर...; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या अक्षेपार्ह फोटो प्रकरणी हायकोर्टाची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण जाणून घ्या

Maharashtra Tourism: वीकेंडला कुठं जावं? शांत, सुंदर आणि निवांत…; नागपूरमधील 'ही' ठिकाणं पिकनिकसाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT