Chaturgrahi Yog 2025 Saam Tv
राशिभविष्य

Chaturgrahi Yog: बुधाच्या गोचरमुळे तयार होणार चतुर्ग्रही योग; या राशींच्या आयुष्यात येणार पैसाच पैसा

Chaturgrahi Yoga 2025: ज्योतिषांच्या मते, बुधाचा गोचर होत असून त्यातून चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. हा विशेष ग्रहयोग काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

6 डिसेंबर एक अत्यंत दुर्मिळ संयोग तयार झाला आहे. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या राशीत आधीच तीन मोठे ग्रह उपस्थित आहेत. यामध्ये सूर्य, मंगळ आणि शुक्र यांचा समावेश आहे.

अशा परिस्थितीत बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य मिळून वृश्चिक राशीत चतुर्ग्रही योग तयार करत आहेत. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, हा दुर्मिळ संयोग तीन राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

हा योग मेष राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम मानला जातो. प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मिळण्याची शक्यता आहे. तुमची निर्णयक्षमता मजबूत होईल. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळणार आहे. कमाईसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

वृश्चिक रास

हा योग थेट तुमच्या राशीत तयार होत असल्यामुळे त्याचा प्रभाव सर्वाधिक वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर होईल. सामाजिक स्तरावर तुमची प्रतिमा अधिक मजबूत होणार आहे. लोक सल्ला किंवा मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे येणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांत सकारात्मक बदल होणार आहे.

कुंभ रास

हा योग कुंभ राशीच्या लाभभावाला अधिक मजबूत करणारा आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांचे वेतन किंवा कमाई वाढू शकते. व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत. व्यापाराशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील. भविष्यातील योजनांमध्येही समान गुंतवणूक करू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

Beed Crime: २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, ऊस तोडणीसाठी करताना भयंकर घडलं; बीड हादरले

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबरचे ₹१५०० जमा; लाडकीला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा

Mumbai Local: नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत, १२ वाजता लोकलच्या हॉर्नने CSMT स्थानकात आवाज घुमला, मुंबईकरांचा जल्लोष अन् डान्स, व्हिडिओ व्हायरल

Leftover Rice 5 Dishes : रात्री उरलेल्या भातापासून बनवा या ५ टेस्टी आणि झटपट डिशेस

SCROLL FOR NEXT