Grah Gochar Deepawali saam tv
राशिभविष्य

Grah Gochar Deepawali: दिवाळीपूर्वी काही ग्रहांच्या स्थितीमध्ये होणार बदल; 'या' राशींना मिळणार दिवाळी गिफ्ट

Grah Gochar Deepawali 2024: यंदाची दिवाळी वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, देखील महत्त्वाची मानली जातेय. दिवाळीपूर्वी तर दिवाळीत काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

येत्या आठवड्यात दिवाळीला सुरुवात होणार असून सर्वांच्या घरी सुरुवात झाली असेल. यंदाची दिवाळी वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, देखील महत्त्वाची मानली जातेय. यावेळी दिवाळीपूर्वी तर दिवाळीत काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत.

कोणत्या ग्रहांची स्थिती बदलणार?

23 ऑक्टोबर 2024 रोजी बुध ग्रहाने विशाखा नक्षत्रात प्रवेश केला. त्यानंतर 24 ऑक्टोबर, गुरुवारी गुरु स्वाती नक्षत्रात प्रवेश केला आहे. यानंतर शुक्र आणि मंगळ देखील नक्षत्र गोचर केलं आहे. 27 ऑक्टोबरला शुक्र ज्येष्ठात प्रवेश करणार असून 28 ऑक्टोबरला मंगळ पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

29 ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी पूर्वा भाद्रपद नक्षत्रात वरूण ग्रह म्हणजेच नेपच्यून गोचर करणार आहे. ज्योतिषांच्या मते, याचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार असून काही राशींच्या व्यक्तींना यावेळी लाभ होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे फायदे मिळवू शकता. व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. जुनं प्रेम परत मिळू शकणार आहे. दीर्घकाळ चाललेला आजार आता बरा होऊ शकतो.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण राहणार असून तुमची धार्मिक कार्यात रुची राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांना या ५ ग्रहांच्या स्थिती बदलाचा फायदाच होणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळू शकणार आहे. घरात सुख-शांती नांदू शकणार आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udgir Fort History: मध्ययुगीन युद्धभूमी आणि भव्य संरचना, उदगीर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Solapur : सोयाबीनच्या बीलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला; दुसऱ्याच खात्यावर वटला ४ लाखाचा चेक

Sshura Khan : खान कुटुंबाची सून शूरा आहे तरी कोण? वाचा Unknown Facts

Pune Traffic Protest : चाकणपेक्षा गुजरात बरा! वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्योजक रस्त्यावर उतरले

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT