Shukra  Saam Tv
राशिभविष्य

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य आणि सुखाचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह अस्ताला गेल्यावर काही राशींवर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात दैत्यांचे गुरु शुक्र यांना विशेष महत्त्व दिले जाते. शुक्र हा भोग-विलास, प्रेम-आकर्षण, धन-वैभव, विवाह यांचा कारक मानला जातो. ठराविक कालावधीनंतर शुक्र आपली स्थिती बदलतो आणि त्याचा परिणाम सर्वा राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो.

१२ डिसेंबर रोजी शुक्र वृश्चिक राशीत अस्त झाला असून ते १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत या अवस्थेत राहतील. त्यानंतर तो पुन्हा उदय होणार आहे. दरम्यान, २० डिसेंबर रोजी शुक्र अस्त अवस्थेत धनु राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र अस्त होताच मांगलिक कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच सर्व राशींवर त्याचा काही ना काही परिणाम दिसून येतो. या काळात तीन राशींना विशेष अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वृषभ राशी (Taurus)

शुक्र सातव्या भावात अस्त होणार असल्याने विवाह, जीवनसाथी यासंबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात. जीवनात वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनावश्यक राग टाळावा. अन्यथा नातेसंबंध तुटण्याच्या स्थितीत पोहोचू शकतात. वरिष्ठ अधिकारी नाराज होऊ शकतात. व्यापारात मोठा नफा होणार नाही.

तूळ राशी (Libra)

पहिल्या आणि आठव्या भावाचा स्वामी असलेला शुक्र दुसऱ्या भावात अस्त होईल. त्यामुळे तुला राशीच्या लोकांना नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागू शकतो. गाडी चालवताना किंवा प्रवास करताना विशेष काळजी घ्या. धनहानीची शक्यता आहे. त्यामुळे पैसा खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.

वृश्चिक राशी (Scorpio)

या राशीच्या लग्नभावात शुक्र अस्त होणार आहे. कुटुंबासोबत मतभेद होऊ शकतात. करिअरच्या दृष्टीने कामाचा ताण वाढेल आणि मानसिक तणाव जाणवणार आहे. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांपेक्षा चांगले प्रदर्शन करणे कठीण जाणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये जीवनसाथीसोबत वादविवाद होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकाच रुळावर समोरासमोर आल्या दोन लोकल, चर्नी रोड स्थानकाजवळील घटना

Maharashtra News Live Update: सैराट फेम आरबाज शेख याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत 1 लाख रुपयाचा चेक देऊन करण्यात आली मदत

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

SCROLL FOR NEXT