Budh Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: ७ मे रोजी चमकणार 'या' राशींचं नशीब चमकणार; बुध ग्रहाच्या गोचरमुळे मिळणार पैसा-संपत्ती

Budh Gochar In Aries: मे महिन्यामध्ये बुध ग्रह गोचर करणार आहे. यावेळी बुध मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. यामध्ये कोणाला लाभ मिळेल ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह जवळपास १ महिन्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. बुध ग्रह वाणी, संचार, व्यापार, बुद्धी आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. त्यामुळे बुध ग्रह जेव्हा पण त्याच्या राशीत बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम या गोष्टींवर पडत असतो. येत्या काळात बुध ग्रह पुन्हा गोचर करणार आहे.

कधी करणार बुध ग्रह गोचर?

मे महिन्याच्या सुरुवातील बुध ग्रह त्याच्या राशीत बदल करणार आहे. यावेळी काही राशींचा गोल्डन काळ सुरु होणार आहे. यावेळी बुध मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी काही राशींना त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण अनुभवता येणार आहेत. तर काहींना चांगला लाभ मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

या राशींच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचं गोचर लाभदायक ठरणार आहे. बुध ग्रह स्वतःच्या राशीचा स्वामी आहे. पैसा कमावण्यासाठी नवे मार्ग खुले होणार आहेत. गुंतवणूकीत तुम्हाला चांगले पैसे मिळू शकणार आहेत. आनंदाची बातमी कानी येऊ शकते.

सिंह रास

बुध ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होणार आहे. तुम्ही कोणत्या चांगल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करू शकता. तुम्ही कामासंदर्भात बाहेरगावी जाऊ शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळणार आहे.

तूळ रास

बुध ग्रहाचं गोचर या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. यावेळी अचानक पैसा हाती मिळणार आहे. नातेसंबंधांमध्ये असलेल्या अडचणी दूर होणार आहेत. पार्टनरशिपमध्ये केलेलं काम लाभ देणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT