Malavya Rajyog saam tv
राशिभविष्य

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Lucky zodiac signs: ज्योतिषशास्त्रानुसार, तब्बल ५० वर्षांनी मालव्य राजयोग आणि बुधादित्य राजयोग यांची युती होत आहे. या दोन राजयोगांच्या शुभ प्रभावामुळे काही राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटू शकते आणि त्यांना अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करून शुभ योग आणि राजयोग निर्माण करतात. याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर स्पष्टपणे दिसून येतो. सप्टेंबर महिन्यात शुक्र ग्रह आपल्या स्वराशी तूळ राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे.

याच काळात बुध आणि सूर्य यांच्या युतीने बुधादित्य राजयोगही निर्माण होईल. या दोन योगांचा काही राशींवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडणार असून त्यांच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होऊ शकते. काहींना नवीन नोकरीच्या संधी, प्रचंड आर्थिक लाभ, अडकलेले पैसे परत मिळणे आणि देश-विदेश प्रवासाची संधी मिळू शकते. यावेळी कोणत्या राशींचा यामध्ये समावेश आहे ते पाहूयात

मकर रास

मकर राशींसाठी मालव्य आणि बुधादित्य राजयोग अतिशय फलदायी ठरू शकतात. कारण हे योग तुमच्या राशीपासून कर्मस्थानात तयार होत आहेत. या काळात व्यापाऱ्यांना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. उत्पन्नाचे एकाहून अधिक स्रोत निर्माण होतील. प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशींसाठी हे दोन राजयोग अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. मेहनतीसोबतच नशिबाची साथ मिळणार आहे. धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक कामांमध्ये रुची वाढेल. विदेश प्रवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. नोकरी करणाऱ्यांना मान-सन्मान आणि बढतीच्या संधी मिळतील.

तूळ रास

तुळ राशींसाठी मालव्य आणि बुधादित्य राजयोग तुमच्या लग्न भावात तयार होतोय. मान-सन्मानाची प्राप्ती होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद वाढण्याची शक्यता आहे. भागीदारीतील व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निकाल तुमच्या बाजूने येईल. करिअरमध्ये नवे टप्पे गाठता येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil Photos: रुपाची राणी! गौतमी पाटील झाली राधा, आरस्पानी सौंदर्य

Terrace Farming : सेंद्रिय पद्धतीने टेरेसवर फुलविली शेती; तळेगावातील उच्चशिक्षित महिलेचा प्रयोग

Horoscope Tuesday : अंगारकी चतुर्थीला ४ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे भविष्य

Herbal Tea : सकाळी उठल्यावर प्या 'ही' हर्बल टी, पोटाच्या समस्यांपासून होईल सुटका

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये एकाच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद

SCROLL FOR NEXT