Mangal Nakshatra Gochar: ऑगस्ट महिन्यात मंगळ करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना मिळणार अपार संपत्ती

Mangal Nakshatra Gochar 2025: ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीतील बदल ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जातात. ऊर्जा, साहस आणि भूमीचा कारक ग्रह मंगळ, ऑगस्ट महिन्यात एक महत्त्वाचे नक्षत्र परिवर्तन करणार आहे.
Mangal Nakshatra Gochar
Mangal Nakshatra Gocharsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह-गोचर आणि नक्षत्र परिवर्तनाला खूप महत्त्व दिलं जातं. ज्योतिषानुसार मंगळ हा साहस, ऊर्जा, पराक्रम आणि दांपत्य जीवनाचा कारक मानला जातो. तर हस्त नक्षत्र हे चंद्राशी संबंधित असून, चातुर्य, कौशल्य आणि कर्माचं प्रतीक आहे.

ज्योतिषीय गणनेनुसार, १३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजून ४४ मिनिटांनी मंगळ उत्तराफाल्गुनी नक्षत्रातून ‘हस्त’ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्र परिवर्तनाचा पाच राशींवर विशेष मंगलकारी परिणाम होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष

मेष राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे कारण मंगळ हा या राशीचा स्वामी ग्रह आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात नव्या मिळतील. मानसिक दृष्ट्या आनंदी राहाल. कोर्ट-कचरीतील प्रकरणांत यश मिळेल. जमिनीशी संबंधित वाद मिटतील.

Mangal Nakshatra Gochar
Mangal Gochar: मंगळाच्या गोचरमुळे या राशींच्या अडचणी वाढणार, पैसा जाणार आणि व्यवसायातही होणार नुकसान

सिंह

सिंह राशीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुमची नेतृत्व क्षमता आणि निर्णय घेण्याची ताकद ओळखली जाणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीतून लाभ मिळू शकतो. विदेश प्रवासाचे योग आहेत.

Mangal Nakshatra Gochar
Today money rain zodiac signs: आज 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस; शशी आदित्य राजयोग चमकवणार नशीब

वृश्चिक

वृश्चिक राशीवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो कारण मंगळ हा या राशीचाही स्वामी आहे. या काळात गुंतवणुकीतून लाभ मिळेल. जुनी अडकलेली कामं पुन्हा सुरू होतील. आरोग्य चांगलं राहील.

मकर

मकर राशीसाठी मंगळाचा हा नक्षत्र परिवर्तन अनुकूल आहे. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा खूप चांगली होईल. घरात सामंजस्य आणि शांतता राहील. करिअरमध्ये मोठा निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे.

Mangal Nakshatra Gochar
August 2025 Planets Transits: ऑगस्टमधील ग्रहांच्या गोचरमुळे 'या' राशी जगणार राजासारखं आयुष्य; आपोआप मिळणार पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com