Surya Grahan 2025 Effect on Zodiac Signs saam tv
राशिभविष्य

Surya Grahan 2025 : सर्वपितृ अमावस्येला लागणार वर्षातील शेवटचं ग्रहण; जाणून घ्या तारीख आणि सूतकाची वेळ

Last eclipse of the year: ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील शेवटचे ग्रहण (Last Eclipse) एका अत्यंत महत्त्वपूर्ण दिवशी होत आहे. हे ग्रहण पितृ पक्षाचा शेवटचा दिवस असलेल्या सर्वपित्री अमावस्येच्या (Sarvapitru Amavasya) दिवशी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण लवकरच होणार आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण पितृपक्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच सर्वपितृ अमावास्येला लागणार आहे. या दिवशी पितरांना निरोप दिला जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, सूर्याला राहू ग्रहण लावतो. परंतु हे ग्रहण भारतात दिसणार का? आणि सूतक काल याठिकाणी लागू होणार का? चला जाणून घेऊया या ग्रहणाचा काळ, सूतकाची वेळ आणि महत्त्वाची माहिती.

२०२५ मधील अंतिम सूर्यग्रहण कधी आहे?

सालातील शेवटचं सूर्यग्रहण २१ सप्टेंबरच्या रात्री लागणार आहे. याच दिवशी सर्वपितृ अमावास्या आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत राहील. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

या ग्रहणाचा प्रभाव कन्या राशीत होणार आहे. सूर्यग्रहणाचा सूतक काल साधारणपणे १२ तास आधी सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय वेळेनुसार २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी सूतक लागणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असल्याने सूर्याचा काही भागच झाकला जाणार आहे. पण भारतात हे ग्रहण अदृश्य असल्यामुळे याठिकाणी सूतक काल मान्य होणार नाही.

सूर्यग्रहण २०२५ वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार)

  • ग्रहण सुरू : रात्री १०:५९

  • ग्रहणाचा मध्य : पहाटे १:५९

  • ग्रहण समाप्त : पहाटे ३:२३

सूर्यग्रहण कुठे दिसणार?

हे ग्रहण प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, फिजी व न्यूझीलंडच्या भागात दिसेल.

  • होबार्ट (ऑस्ट्रेलिया) : सकाळी ६:०३

  • न्यू कॅसल (ऑस्ट्रेलिया) : सकाळी ५:४५

  • सिडनी : सकाळी ५:४८

  • सुवा (फिजी) : सकाळी ७:५८

  • ऑकलंड (न्यूझीलंड) : सकाळी ६:१३

  • वेलिंग्टन (न्यूझीलंड) : सकाळी ६:१४

सूर्यग्रहणाच्या दिवशी श्राद्ध-तर्पण करता येईल का?

२१ सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण व सर्वपितृ अमावास्या एकाच दिवशी येत असल्याने अनेकांच्या मनात प्रश्न आहे की श्राद्ध किंवा तर्पण करता येईल का? कारण भारतात हे ग्रहण दिसणार नाही, त्यामुळे याचा परिणाम याठिकाणी होणार नाही. म्हणूनच श्राद्ध, तर्पण आणि इतर विधी नेहमीप्रमाणे करता येतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

SCROLL FOR NEXT