Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Ind Vs Oman, Asia Cup 2025: आशिया कपमधील सुपर ४ सामन्यांसाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) च्या नेतृत्वाखालील एका संभाव्य संघाचा आज ओमान विरुद्ध सामना रंगणार आहे.
Asia Cup 2025
Asia Cup 2025saam tv
Published On
Summary
  • भारताचा सामना ओमानशी होणार आहे.

  • भारत सुपर-4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आहे.

  • अर्शदीप सिंहला शंभराव्या विकेटची संधी असू शकते.

आशिया कप 2025 मध्ये आज भारतीय टीमचा सामना ओमानशी होणार आहे. ओमानची टीम आधीच सुपर-4 च्या शर्यतीतून बाहेर पडलीये. तर भारत हा या स्पर्धेत सुपर-4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला होता. त्यामुळे आजचा सामना औपचारिकतेसाठीच टीम इंडिया सलग तिसरा विजय मिळवत हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

सूर्या ब्रिगेड टीममध्ये बदल करणार का?

कर्णधार सूर्यकुमार यादवची ब्रिगेड जर जुना फॉर्म्युला वापरणार असेल तर संघात कोणताही बदल होणार नाही. मात्र, जर बेंच स्ट्रेंथ वापरण्याचा विचार झाला तर काही बदल दिसू शकतात. विशेषत: जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्याची शक्यता आहे.

यावेळी त्यांच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला संधी मिळू शकते. अर्शदीपने आतापर्यंत टी-20 स्वरूपात 99 विकेट्स घेतले आहेत आणि आज खेळल्यास त्याच्या शंभराव्या विकेट्सची नोंद होऊ शकते.

Asia Cup 2025
Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

फलंदाजीत बदल होणार का?

फलंदाजीत फारसे बदल अपेक्षित नाहीत. परंतु फलंदाजीच्या क्रमात नक्की फेरबदल दिसण्याची शक्यता आहे. विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनला अजूनपर्यंत खेळण्याची संधी मिळालेली नाही. आज त्याला वरच्या क्रमावर उतरवलं जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अक्षर पटेल, हार्दिक पांड्या किंवा शिवम दुबे यांनाही वरच्या क्रमावर खेळवलं जाऊ शकतं.

Asia Cup 2025
Betting App Case: युवराज सिंहला ED ची नोटीस; 23 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.

Asia Cup 2025
PAK vs UAE: आधी नकार आता होकार; आशिया कपमध्ये पाकिस्तानचा ड्रामा; उशिराने सुरू होणार थरारक सामना

सामना किती वाजता?

भारत विरुद्ध ओमान यांच्यातील सामना अबूधाबीतील शेख झायेद स्टेडियमवर रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. भारताने यापूर्वीच दोन्ही सामने दुबई स्टेडियमवर खेळलेत. अबूधाबीची ही नवीन परिस्थिती भारतीय टीमसाठी वेगळी आव्हानं निर्माण करू शकतं.

Asia Cup 2025
Cricket : अष्टपैलू खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सामन्यादरम्यान झाले वडिलांचे निधन; VIDEO
Q

आशिया कप २०२५ मध्ये भारताचा आजचा सामना कोणाशी आहे?

A

भारताचा सामना ओमानशी होणार आहे.

Q

भारत कोणत्या फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला?

A

भारत सुपर-4 फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला.

Q

जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळू शकते?

A

अर्शदीप सिंहला संधी मिळू शकते.

Q

संजू सॅमसनला कोणत्या भूमिकेत खेळवले जाऊ शकते?

A

विकेटकीपर-फलंदाज म्हणून वरच्या क्रमावर खेळवले जाऊ शकते.

Q

भारत विरूद्ध ओमान सामना कुठे आणि किती वाजता होणार आहे?

A

सामना अबूधाबीत रात्री 8 वाजता होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com