Maharashtra Live News Update: हत्येच्या आरोपीची नंदूरबार पोलिसांनी काढली शहरातून धिंड

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२५, मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

Nandurbar : हत्येच्या आरोपीची पोलिसांनी काढली शहरातून धिंड

हत्येच्या आरोपीची पोलिसांनी नंदूरबार शहरातून धिंड काढली.

भाईगिरी विरोधात नंदुरबार पोलीस ॲक्शन मोडवर...

मंगळवारी कापसातील वादामुळे जयेश भील या युवकाची झाली होती हत्या

पोलिसांनी आरोपीच्या घरातून शहर पोलीस ठाण्यापर्यंत काढली धिंड

Nagpur : नागपुरात ओबीसी महामोर्चा समितीकडून बैठक, काँग्रेसचे वडेट्टीवारही उपस्थित

नागपुरात सकल ओबीसी महामोर्चा समितीकडून ओबीसी समाजातील विविध सामाजिक संघटना आणि विविध समाजातील प्रतिनिधींसोबत म्हत्वाची बैठक घेतली जात आहे. या बैठकीला कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती आहे. या बैठकीचा विशेष महत्त्व म्हणजे 10 ऑक्टोबरला होणाऱ्या ओबीसी महामोर्चाची तयारीसाठी आढावा घेतला जात‌ आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी उपस्थित आहेत.

पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी ५ जणांना पोलीस कोठडी

कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ गँगच्या ५ जणांना पोलीस कोठडी

पाच ही जणांना २५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

मयूर गुलाब कुंबरे ,मयंक विजय व्यास,गणेश सतीश राऊत ,दिनेश राम फाटक ,आनंद अनिल चादळेकर या पाचही आरोपींना कोथरूड गोळीबार प्रकरणी पुणे पोलिसांनी केली होती अटक

हे पाचही निलेश घायवळ गँग मधले आरोपी असून त्यांच्यावर पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे राज्यमंत्र्यांचे  आवाहन

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे असे आवाहन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.

पुण्यात पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज दुरुस्ती करून वाहतूक केली सुरळीत

पुण्यात गेल्या २ दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय. शहरातील विविध भागात पावसामुळे पाणी साठत आहे परिणामी पुणेकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावं लागतंय. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत रहावी म्हणून पुणे पोलिसांच्या वाहतूक कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. या ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्यांचे नागरिकांना केलेल्या मदतीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. अशातच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये वाहतूक पोलिस कर्मचारी स्वतः थेट ड्रेनेज मध्ये हात घालून साफ करत आहेत. हा व्हिडिओ पुण्यातील सिंहगड रोड भागातील वडगाव पुलाजवळ टिपण्यात आला. जोरदार पावसामुळे वडगाव पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पादचाऱ्यांना सुद्धा अडचणी येत होत्या. याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचारी नेहरकर आणि पोलिस कर्मचारी राऊत यांनी ड्रेनेज दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केली

Maharashtra News : महाराष्ट्र शासनाचा विविध कंपन्यांसोबत नऊ सामंजस्य करार

मुंबईतील गोरेगाव येथे एआयआयएफए (आयफा) आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे नऊ कंपन्यांशी ८०,९६२ कोटी रूपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरित झाले. या करारामुळे राज्यात ४० हजार ३०० रोजगार निर्मिती होणार आहे.

मराठा ओबीसी आरक्षणावर अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं मोठं भाष्य

प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे नेहमी त्यांच्या अभिनयासाठी चर्चेत असतात. ते त्यांच्या विनोदीशैलीने चाहत्यांना खळखळून हसवतात. मराठी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे अनासपुरे दिलासखुलासपणे समाजिक विषयांवरही आवर्जुन भाष्य करत असतात. आता राज्यात सुरु असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरील वादावरही अनासपुरेंनी भाष्य केलंय. 'गावात गावकी आणि भावकी एकत्र होती. यापुढेही एकत्र राहू, असे म्हणत मकरंद अनासपुरे यांनी आरक्षणावरून सुरु झालेल्या वादावर भावना व्यक्त केल्या आहेत.

साईबाबांच्या महानिर्वाणदिनाची नोंद राष्ट्रीय कॅलेंडर मध्ये व्हावी यासाठी शिर्डीत महामंथन

शिर्डीच्या साईबाबांचे 15 ऑक्टोबर 1918 रोजी महानिर्वाण झाले होते.. त्यामुळे 15 ऑक्टोबर या‌ दिवसाची राष्ट्रीय कॅलेंडर मध्ये नोंद व्हावी यासाठी दिल्ली येथील सिद्धपीठ संस्थेच्या वतीने शिर्डीत महामंथन पार पडले.. राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये नोंद व्हावी यासाठी साई संस्थान, लोकप्रतिनिधी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या पुढाकारातून एक शिष्टमंडळ तयार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासंदर्भात या महामंथन कार्यक्रमात चर्चा करण्यात आली.. यासोबत साईबाबांच्या‌ जिवनावर आधारीत चित्रपट बनवणारे निर्माते आशिम खेत्रपाल लिखीत 2000 पुर्वीची आणि त्या नंतरची शिर्डी या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले.

कल्याण शहरामध्ये नवरात्रौत्सव काळात जड -अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी

वाहतूक कोंडीने त्रासलेल्या कल्याणकर नागरिकांना येणाऱ्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी तात्पुरता दिलासा दिला आहे. कल्याणात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला वाहतूक पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी करत ही माहिती दिली आहे.

राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांचं आंदोलन

कायमस्वरूपी एसटी बस थांब्याला मंजुरी मिळावी या मागणीसाठी राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांनी निषेध केलं. या निषेधात ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु

बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची फेसबुक पोस्टद्वारे माहिती

15 ऑक्टोबर पासून दुपारी 12.55 मिनिटांनी सोलापूर-मुंबई आणि दुपारी 2.45 मुंबई-सोलापूर विमानसेवेस प्रारंभ

तर सकाळी 11.10 वाजता बंगळूरू-सोलापूर आणि दुपारी 4.15 वाजता सोलापूर-बंगळूरू असणार विमानसेवा

या दोन्ही शहरासाठी 20 सप्टेंबरपासून नागरिकांना विमान तिकीट बुकिंग करता येणार आहे

यवतमाळ जिल्हा परिषदेवर विद्यार्थी धडकले

यवतमाळच्या कामठवाडा येथे जिल्हा परिषदेच्या एक ते पाच वर्ग आहे मात्र पाच वर्गाकरिता एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षक देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात धडक दिली.विद्यार्थ्यांनी यावेळी दोन शिक्षक देण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचं विद्यार्थ्यांनी लक्ष.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUI च आंदोलन

विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ केल्यानंतर NSUI करणार शासनाच्या विरोधात आंदोलन

विद्यापीठाने केलेली शुल्क वाढ हा विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचे आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या मुख्य बिल्डिंग समोर NSUI सह विद्यार्थ्यांचं आंदोलन

सोमवारी होणार ठाण्याच्या मेट्रोचा ट्रायल रन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपास्थित होणार ट्रायल रन

ठाण्याच्या मेट्रोचा ट्रायल रन ला मिळाला मुहूर्त

नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार ट्रायल रन

ट्रायल रन नंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावणार , वाहतूक कोंडी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने मेट्रो लवकर सुरू करणार

Vasai : वसईच्या गिरीराज कॉम्प्लेक्समधील कंपनीला भीषण आग 

वसईच्या तुंगारफाटा, गिरीराज कॉम्प्लेक्समधील चौथ्या माळ्यावर एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ब्रँड वर्क टेक्नॉलॉजी असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे.

ठेकेदाराच्या फायद्यासाठी नागरिकांना किडलेले धान्य? वखार महामंडळावर भ्रष्टाचाराचा आरोप

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या खाजगीकरणानंतर ठेकेदारांच्या फायद्यासाठी नागरिकांना किडलेले व निकृष्ट धान्य पुरवले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. राज्यातील जवळपास २७ लाख मेट्रिक टन क्षमतेची वखार व्यवस्था खासगी कंपनीला तब्बल १२० कोटी रुपयांच्या करारातून देण्यात आली. या करारामुळे धान्य साठवणुकीत निष्काळजीपणा, अपुरे मनुष्यबळ, पिल्फरेज, नादुरुस्त वजन काटे आणि सीसीटीव्ही सुरक्षेचा अभाव यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असल्याचे ते म्हणाले.

हिंगोलीत निघाला बंजारा समाजाचा मोर्चा, हजारो नागरिक सहभागी

एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा बंजारा समाज आक्रमक झाला आहे, आज मराठवाड्याच्या हिंगोलीत बंजारा समाजाने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे, बंजारा समाजाचे धर्मगुरू बापू सिंग महाराज यांची या मोर्चाला विशेष उपस्थिती होती दरम्यान मागील 40 वर्षापासून आम्ही सरकारकडे एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी करतोय मात्र सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे बंजारा समाज येणाऱ्या काळात आंदोलनाची वेगळी दिशा ठरवणार असल्याचं यावेळी बाबूसिंग महाराज म्हणाले आहेत.

Pune : सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आंदेकरवर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल

आयुष कोमकर खून प्रकरणात आरोपी सोनाली आंदेकरला ताब्यात घेण्यासाठी काल पोलीस गेले असता पोलिसाच्या सरकारी कामात अडथळा करून सोनाली आंदेकरीला ताब्यात घेण्यास विरोध करणाऱ्या बारा जणांविरोधात गुन्हा दाखल.

या प्रकरणात आता पोलिसांनी तक्रार दाखल करत थेट सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा सोनाली आंदेकर आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात दाखल केला आहे.

Nashik : नाशिकच्या पंचवटी परिसरात झालेले गोळीबार प्रकरण, 11 संशयितांना पोलिसांनी केली अटक

* नाशिकच्या पंचवटी परिसरात झालेले गोळीबार प्रकरण

* 11 संशयितांना पोलिसांनी केली अटक

* 17 तारखेला मध्यरात्री सागर जाधव या तरुणावर झाला होता गोळीबार

* पूर्व वैमनस्यातून आणि वर्चस्व वादातून गोळीबार झाल्याचं उघड

* गोळीबार प्रकरणाने पंचवटी परिसरातील टोळीयुद्ध आले समोर

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट संजय राऊत विरोधात आक्रमक

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट संजय राऊत विरोधात आक्रमक

शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन

संजय राऊत विरोधात आंदोलनादरम्यान शिवसैनिक संतप्त

Gopichand Padalkar : माफी मागायचा काय विषय येत नाही, जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर पडळकर ठाम

आमदार गोपीचंद पडळकर जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ठाम

पंतप्रधानांच्या आईवर AI च्या माध्यमातून टीका झाली त्यावेळी शरद पवारांनी फोन केला होता का

माफी मागायचा काय विषय येत नाही

Solapur : अक्कलकोट तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने घेतली विश्रांती

अक्कलकोट तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने घेतली विश्रांती

सतत पडत असलेल्या पावसामुळे नदी -नाले-तलाव यांच्यात पाण्याची पातळी वाढल्याने शिरले होते अनेक शेतात पाणी

शिरवळवाडी तलावाची पाणी पातळी वाढल्यामुळे खरीप हंगामाचे पिकाचे झाले होते नुकसान

तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे शेतातील पाणी होत आहे कमी.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात चिखल झाल्याचं आलं दिसून.

तालुका प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी..

Imtiaz Jaleel : सहायक पोलिस आयुक्तांची माजी खासदार इम्तियाज जलील याना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस

सहायक पोलिस आयुक्तांची माजी खासदार इम्तियाज जलील याना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस

नोटीसिवरून इम्तियाज जलील यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप

पोलिसांनी केलेले बेकायदेशीर कृत्य उघड झाले आहे आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची विनंती महासंचालकांना करा, असा सोशल मीडियावर मेसेज टाकला आहे.

हा खटला पूर्णपणे खोटा आहे आणि मला गप्प करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. मी त्याचा सामना करेन असेही इम्तियाज जलील यानी म्हंटले आहे.

Nandurbar : पावसाळ्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागातील रस्त्यांची दुरावस्था

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रांगांमध्ये धडगाव तालुक्यात पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्ते खचल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाल्याने या भागातून येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिकांना रुग्णांपर्यंत पोहोचण्यासही उशीर होत आहेत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या या ग्रामीण भागातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे संबंधित यंत्रणा सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे कानाडोळा करत असल्याचाही आरोप नागरिक करीत आहे.

Amravati: अमरावतीत तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलन

अमरावती विभागीय वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आज तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने विविध न्याय्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कामगारांनी ठेकेदार व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देत आपल्या समस्या मांडल्या.

कामगारांनी जुन्या व अनुभवी कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करू नये, सर्व कंत्राटी कामगारांची ज्येष्ठता यादी तयार करावी, तसेच सुरक्षा साधने पुरवण्यात यावी, अशी मागणी केली. याशिवाय कंत्राटी कामगारांना ठेकेदारांकडून अनुभव प्रमाणपत्र देण्यात यावे व वारंवार होणाऱ्या अपघातांवर प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी संघटनेने केली.या आंदोलनामुळे वीज वितरण कंपनीच्या प्रशासनासमोर कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे

Solapur: उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस

- उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसात पडलेल्या पावसामुळे फळबाग पिकाला फटका.

- उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अति पावसाचा त्रास करावा लागतो सहन.

- साखरेवाडी येथील गौरीशंकर साखरे यांच्या 13 एकर द्राक्ष मध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे द्राक्ष पिकाचं नुकसान

- द्राक्ष उत्पादक शेतकरी साखरे यांचे 60 ते 65 लाख रुपयांचे नुकसान.

- द्राक्ष फळबागांचे नुकसान झाल्यावर त्वरित पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

Nagpur: नागपूरच्या संविधान चौकात बंजारा समाजाचे धरणे आंदोलन

- आंदोलनात पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांचा सहभाग

- हैद्राबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी आंदोलन

- आंदोलनात वेगवेगळ्या भागातून बंजारा बांधवांची उपस्थिती

- राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी

- देशाच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश असल्याचा महिलांचा आरोप

- बोलीभाषा एक, पाहनावा एक मग वेगवेगळ्या प्रवर्गात समावेश कसा, तेलंगणा मध्ये एसटी प्रवर्गात तर आंध्रप्रदेश मध्ये एससी प्रवर्गात समाजाचा समावेश

Kolhapur: कोल्हापूरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला विरोध मोर्चा

कोल्हापुरातील वर्षा नगर मधील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी नागरिक आक्रमक झालेत. वर्षा नगरातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महापालिकेवर मोर्चा काढला, आणि ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी आंदोलकांच्या हातातील फलक हे लक्षवेधी होते. नागरी वस्तीत उभारत असलेला हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असून तो तात्काळ रद्द करावा अन्यथा येणाऱ्या 15 दिवसात उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करू असा इशारा देण्यात आलाय. कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता हा प्रकल्प प्रशासनाच्या वतीने एका ठराविक ठेकेदाराला देण्यात आलेला आहे. भर वस्तीतच अशा पद्धतीचा प्रकल्प तयार करण्यात येत असून महापालिकेच्या विरोधात आता नागरिक आक्रमक झालेत. मानवी वस्तीत होणाऱ्या या प्रकल्पाला विरोध करत हा प्रकल्प अन्य ठिकाणी हलवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

महाडमध्ये संजय राऊत यांच्या फोटोवर जोडे मारून निषेध

अनंत दिघे यांच्या बबात चुकीचे विधान करण्याप्रकरणी रायगडच्या महाडमध्ये संजय राऊत यांचा निषेध करण्यात आला. महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी हे निषेध आंदोलन केले. संजय राऊत यांच्या विरोधी जोरदार घोषणा देत राऊत यांचा फोटोला शिवसैनिकांनी जोडे मारीत मारले.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात

- गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून लावली नाशकात हजेरी

- गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा ९९ टक्क्यांवर

- पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून पुन्हा विसर्ग केला जाण्याची शक्यता

Pune: आंदेकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ

सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आंदेकरवर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल

सोनाली आंदेकरसह बारा जणांनवर सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

आयुष कोमकर खून प्रकरणात आरोपी सोनाली आंदेकरला ताब्यात घेण्यासाठी काल पोलीस गेले असता पोलिसाच्या सरकारी कामात अडथळा करून सोनाली आंदेकरीला ताब्यात घेण्यास विरोध करणाऱ्या बारा जणांविरोधात गुन्हा दाखल.

या प्रकरणात आता पोलिसांनी तक्रार दाखल करत थेट सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा सोनाली आंदेकर आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात दाखल केला आहे.

अधिक तपास समर्थ पोलिस करत आहेत.

 Nevasa: नेवासा तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले

नेवासा तालुक्याला गुरुवारी मध्यरात्री पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले.. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे.. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे ओढे - नाले ओसंडून वाहू लागलेत, तर अनेक रस्त्यांना देखील नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहेत.. तालुक्यातील सोनई, खरवंडी, पानेगाव या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे..

Nagpur: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

- नागपूरच्या संविधान चौकात एकदिवसीय धरणे आंदोलनाला सुरवात

* हैदराबाद गॅझेटच्या धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे बंजारा समाजाची मागणी

* बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन

* बंजारा समाजातील महिला पारंपारिक वेशभूषेत आंदोलनात सहभागी

* नागपूरच्या संविधान चौकात धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयात देणार मागण्यांचे निवेदन

- वेगवेगळ्या घोषणाचे फलक घेत आंदोलनात सहभाग

BJP: भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जत मध्ये मोर्चा

सांगलीच्या जत मधील अभियंता प्रकरणावरून गोपीचंद पडळकर विरोध जयंत पाटील असा संघर्ष निर्माण झाला आहे. गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टिकेच्या निषेधार्थ जत मध्ये महाविकास आघाडी कडून आणि जयंत पाटील समर्थकांकडून मोर्चा काढण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि फलक झळकवत संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Latur: सहकार मंत्र्यांचे अचानक चाकूर कृषी कार्यालयाला भेट,

लातूरच्या चाकूर कृषी कार्यालयाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अचानक भेट दिली आहे.11:30 वाजले तरीदेखील कार्यालय बंदच होते.तर कार्यालयातील कर्मचारी गैरहजर असल्याने, तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा भडगाव करावा अशी मागणी सहकार मंत्री यांनी कृषी उपसंचालक यांच्याकडे फोन द्वारे केली आहे. शेतकरी अतिवृष्टी हैराण आहेत, तर अधिकारी कर्मचारी आपल्याच तोऱ्यात दंग आहेत. तात्काळ या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून अहवाल पाठवावा अशी मागणी सहकार मंत्री यांनी केली आहे.

Pune News: बंडू आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा...

जेल मधे असतानाही बंडू आंदेकरच्या नावावर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती..

काल पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीय यात

सात जणांविरुद्ध कारवाई करण्यात आलीय

तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर सहकुटुंबाच्या बँक अकाउंट सील करून आर्थिक नाड्या आवळल्या आहेत

यातील आरोपी सुटण्यासाठी कुठलाही आर्थिक व्यवहार करता येऊ नये यासाठी पोलिसांकडून करण्यात आली कारवाई

बंडू आंदेकर सर वनराज आंदेकर आणि त्यांच्या पत्नीच्या काही बँक अकाउंट मध्ये आहेत लॉकर हे सगळे सील करण्यात आले आहेत.

शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फोन

शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन दिला आहे. आमदार पडळकरांच्या टीकेवरुन फोन केला आहे. अशी गलिच्छ टीका योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

BJP: भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात इस्लामपूरात मोर्चा

सांगलीच्या जत मधील अभियंता प्रकरणावरून गोपीचंद पडळकर विरोध जयंत पाटील असा संघर्ष निर्माण झाला आहे गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टिकेच्या निषेधार्थ इस्लामपूर मध्ये राष्ट्रवादी आणि जयंत पाटील समर्थकांकडून मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे, या मोर्चासाठी नंतर जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते जत साठी रवाना होणार आहेत. तत्पूर्वी इस्लामपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि फलक झळकवत संताप व्यक्त करण्यात आला आहे.जत पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता आत्महत्या प्रकरणावरून आमदार गोपीचंद पडळकरंकडून जयंत पाटलांवर अर्वाच्य भाषेत व खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती.

Pune: आयफोन १७ घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी

सकाळी ६ पासून पुण्यातील कोपा मॉल मधील अधिकृत पहिल्या आय स्टोअर मध्ये रांगा

सकाळी ६ वाजल्यापासून मॉल च्या बाहेरच पुणेकरांनी केली गर्दी

पुणे शहरातील कोपा मॉल मध्ये असलेले आय फोन चे स्टोअर हे भारतातील १४ वे अधिकृत स्टोअर आहे

सोशल मीडियावर या गर्दीचे व्हिडिओ व्हायरल

Karnatak: कर्नाटकातील चडचण येथील एसबीआय बँक दरोड्यातील पैसे व सोन्याची बँग सापडली...

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती परिसरात सापडली दरोड्यातील पैशाची बॅग...

एका बंद घराच्या छतावर दरोडेखोराने टाकली होती पैशाची व सोन्याची बॅग...

दरोड्यात 1 कोटी 4 लाख रोकड तर 20 किलो चोरीला गेले होते सोने

कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांच्या तपासात दरोड्यातील सापडला ऐवज...

Nagpur:  नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे भव्य चिंतन शिबिर, ५०० हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग

नागपूर -

- नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे भव्य चिंतन शिबिर

- राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात ५०० हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग

- पक्षाचे दृष्टिकोन व भविष्यातील योजना यावर विचारमंथनासाठी राष्ट्रवादीने १० समित्या स्थापन केल्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबरनाथमध्ये

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज अंबरनाथमध्ये

अंबरनाथ , उल्हासनगर, बदलापूर या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीचा आढावा बैठक

कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

येत्या निवडणुकीला समोर ठेवून राज ठाकरे पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यात हा दौरा करीत आहेत

Pune:  जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

पुणे-

जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही

कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आता दस्त नोंदणीपूर्वी जमिनीची मोजणी करावी लागणार आहे.

जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारित १० ते १५ खासगी एजन्सींचे भूकरमापक नेमले जाणार असून, त्यांच्या माध्यमातून मोजणीशिवाय दस्त नोंदणी तसेच फेरफार प्रक्रिया होणार नाही,

अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ही नवी पद्धत महिन्याभरात लागू होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यास मान्यता दिली आहे.

Solapur: मुसळधार पावसाने अक्कलकोट तालुक्याला झोडपले

सोलापूर -

मुसळधार पावसाने अक्कलकोट तालुक्याला झोडपले

ओढ्यातून वाहणाऱ्या प्रचंड प्रवाहामुळे बोरगाव देशमुख - घोळसगाव पूल गेला पाण्याखाली

अतिमुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्याशी संपर्क तुटला

दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश पूल आणि बंधारे ओव्हेर फ्लो झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन झाले आहे विस्कळीत

Pune - वंजारी समाजाला एसटीमधून आरक्षण द्यावे यासाठी पुण्यात वंजारी समाज आक्रमक

पुणे -

वंजारी समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावे यासाठी वंजारी समाज आक्रमक

बीडमध्ये पहिला मोर्चा काढणार जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची घोषणा

कुणी जर अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही

हैदराबाद गॅझेटमध्ये आम्ही एसटीमध्ये आहोत त्यामुळे एसटीचा आरक्षणाला मिळावा ..

राज्य सरकार समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत

एनटीच दोन टक्के आरक्षणाचा फायदा समाजाला नाही

शासकीय जाहिराती आणि नोकरीचा फायदा एनटी मधून होत नाही. राजकीय आरक्षणाची आम्हाला गरज नाही

Pune: पुण्यातील वाहतूक कोंडीवर पाहणी करून सोमवारपर्यंत अहवाल द्या, पालिका आयुक्तांचे आदेश 

पुणे -

पुण्यातील वाहतूक कोंडीवर पाहणी करून सोमवारपर्यंत अहवाल द्या

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे पथ विभागाला बैठक घेत आदेश

शहरातील 32 रस्ते आणि कोंडी होणाऱ्या 22 ठिकाणाची पाहणी करा

पालिका आणि पोलिसांनी प्रयत्न करूनही वाहतूक कोंडी कमी होत नसल्याने आयुक्ताचे आदेश

अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय उपाययोजना करायची यावर निर्णय होणार

Buldhana: शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा म्हणून किसान काँग्रेस आक्रमक

बुलडाणा -

शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा म्हणून किसान काँग्रेस आक्रमक

मलकापूर कृषी कार्यालयात गोधडी, भजन आंदोलन करत दिला ठिय्या

Nashik: नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णसंख्या 400 पार

नाशिक -

- नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णसंख्या 400 पार, सप्टेंबरच्या 17 दिवसांत 464 नवे रुग्ण

- तर ऑगस्ट अखेर एकूण रुग्णसंख्या 424 होती

- मलेरियासह चिकनगुनियाचेही 49 रुग्ण आढळले, तर मलेरियाचे 21 रुग्ण नोंदले गेले

- महापालिकेचा ठेकेदारास 1 लाख 10 हजारांचा दंड

- आरोग्य विभागाकडून डास निर्मूलनासाठी सतर्क असल्याचा दावा

- मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

Pune: पुणे महापालिकेच्या हद्दीत नोंद न झालेल्या मिळकतींवर करआकारणीचा धडाका

पुणे -

पुणे महापालिकेच्या हद्दीत नोंद न झालेल्या मिळकतींवर करआकारणीचा धडाका लावत मिळकतकर विभागाने अवघ्या पाच महिन्यांत ३० हजार ५३६ मिळकतींचा शोध घेतला.

या मिळकतींमधून सुमारे १९८ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल निश्चित झाला असून त्यापैकी ६१ कोटी ८३ लाख रुपये तिजोरीत जमा झाले आहेत.

सुमारे १४ लाख ८० हजार मिळकतींपैकी मोठ्या प्रमाणावर कर न भरलेले गाळे, भोगवटे व नोंदणी न झालेल्या मिळकतींचा समावेश यात आहे.

पालिकेने आर्थिक वर्षाअखेर ८० हजार मिळकती शोधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Yavatmal: यवतमाळमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश

यवतमाळमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश

शेतातील कपाशीने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांने केला पऱ्हाटीजवळ बसून आक्रोश

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाच्या चक्रव्यूहात अडकलाय

Jalna: जालन्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, 997 घरांसह 105 दुकानांमध्ये शिरले पावसाचे पाणी

जालन्याला पावसाने झोडपले

जालना शहरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे 997 घरांसह 105 दुकानांमध्ये शिरले पाणी

अपूर्ण कामे आणि अडकलेल्या कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याचा महानगरपालिकेचा अहवाल

Nagpur: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये शिबिर

नागपूर -

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर महत्त्वाचं मानलं जात आहे.

या शिबिरामध्ये 500 पदाधिकारी येणार असून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे..

कॅबिनेट मिनिस्टर तसेच ज्येष्ठ नेत्यांसाठी पहिल्या रोमध्येच स्टिकर लावून जागा निश्चित करण्यात आली आहे...

यामध्ये सुनेत्रा पवार पार्थ पवार जेष्ठ नेते यांच्या जागेचे स्टिकर लावण्यात आले आहे....

Pune: पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलन

पुणे -

पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलन

परीक्षा शुल्कवाढी परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करणार

पुणे विद्यापीठाने परीक्षा शुल्का मध्ये 20 टक्के वाढ केल्याने विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

अकरा वाजता काँग्रेसची विद्यार्थी संघटना पुणे विद्यापीठामध्ये करणार आंदोलन

Dharashiv: धाराशिवच्या भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील पूल पाण्याखाली

धाराशिव -

धाराशिवच्या भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील पूल पाण्याखाली

पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असतानाही नागरीकांची पुल ओलांडण्यासाठी जिवघेनी कसरत

वाहत्या पाण्यातुन मोटरसायकल चालक व नागरीक करत आहेत जिवघेना प्रवास

सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये करुन बांधलेल्या पुलावरून पाणी,चुकीच काम झाल्याचा स्थानिकांचा आरोप

Hingoli: हिंगोलीमध्ये १४ वर्षांचा मुलगा गेला वाहून, पोहण्यासाठी गेले असता घडली घटना 

हिंगोली -

14 वर्षांचा मुलगा गेला वाहून

मित्रासोबत पोहण्यासाठी गेला होता

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील

देऊळगाव जहागीर गावातील घटना

काल दुपारपासून मुलाचा शोध सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com