Ola Uber Fare Hike
Ola Uber Fare HikeSaam Tv

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

Ola Uber Fare Hike: ओला उबरने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ओला उबरच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना मात्र फटका बसणार आहे.
Published on
Summary

ओला-उबरने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

ओला उबरच्या भाड्यात वाढ

मागणीच्या कालावधीत दीडपट भाडे वाढवण्याची परवानगी

रोज लाखो लोक खाजगी वाहनांनी प्रवास करतात. त्यामध्ये अनेकजण ओला-उबरच्या कारने प्रवास करतात. ओला- उबरने प्रवास करणे खूप सोपे आहे.यासाठी भाडेदेखील निश्चित केले जाते.दरम्यान, आता ओला उबरचे भाडे वाढले आहे. ओला उबरचा प्रवास महागला असून याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. (Ola-Uber Fare Hike)

Ola Uber Fare Hike
Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

ओला उबरच्या भाड्यात वाढ

ओला उबरने प्रवास करताना वेळ, अंतर यानुसार भाडे आकारले जाते. दरम्यान आता प्रति किमीसाठी भाडेवाढ केली आहे. आता ओला उबरचे भाडे प्रति किलोमीटर २२.७२ रुपये आहे.

ओला उबरने प्रवास करताना मागणीच्या कालावधीत दीडपट भाडेवाढ करण्यास परवानगी आहे. मागणी नसलेल्या कालावधीत २५ टक्के सवलत देण्यात आली आहे. दरम्यान आता प्रत्येक फेरीमागील ८० टक्के भाडे हे चालकाला मिळणार आहे. भाडं निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मागणी असलेल्या काळात म्हणजे सकाळी-संध्याकाळी दीडपट जास्त भाडे वाढवण्याची परवानगी आहे. मागणीच्या काळात ३४ तर मागणी नसलेल्या काळात १७ रुपये भाडे प्रति किलोमीटरसाठी द्यावे लागणार आहे

Ola Uber Fare Hike
Electric Scooter: OLA इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत मोठी घट, पण इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी अजूनही जोरात

.

आता उबर, ओला, रॅपिडोला काली-पिली टॅक्सीप्रमाणेच दर आकारण्याची परवानगी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने निर्देश जारी केले आहे. यानुसार कालपासून ओला-उबरच्या भाड्यात वाढ झाली आहे. एमएमआरटीएने म्हटलंय की, काली पिली टॅक्सीचे भाडे सध्या २०.६६ रुपये आहे. तर एसी वाहनांसाठी २२.७२ रुपये आहे. आता हेच दर ओला-उबर आणि रॅपिडो कंपन्यांसाठी लागू होणार आहे.

Ola Uber Fare Hike
Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com