OLA-UBER: कॅब चालकाची विष पिऊन आत्महत्या, ओला-उबर चालक आक्रमक; आंदोलन चिघळणार?

OLA-UBER Driver Died: नालासोपाऱ्यामध्ये ओला चालकाने आत्महत्या केली. राहत्या घरी त्याने विष प्राशन करून आयुष्य संपवले. सरकारने मागण्या मान्य न केल्यामुळे या चालकाने टोकाचे पाऊल उचलले. यामुळे खळबळ उडाली.
OLA-UBER: ओला चालकाची विष पिऊन आत्महत्या, ओला-उबर चालक आक्रमक;  सरकारला दिला इशारा
OLA-UBER Driver DiedSaam Tv
Published On

वसई-विरार शहरात मागील काही दिवसांपासून ओला आणि उबर चालकांचे भाडेवाढीसाठी सुरू असलेले आंदोलनाला आता भीषण वळणावर पोहोचले आहे. कारण नालासोपाऱ्यात ओला-उबर चालकाने आत्महत्या केली. राहत्या घरी विष प्राशन करून या चालकाने आयुष्य संपवलं. शासनाकडून कोणतेही सकारात्मक आश्वासन न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या या ओला चालकाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

सनोज सक्सेना (वय ४५ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या ओला चालकाचे नाव असून तो नालासोपाऱ्यातील बिलाल पाडा भागात कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. स्थानिक नागरिकांनी या चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. या घटनेमुळे चालकांच्या संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सरकारने तत्काळ याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

OLA-UBER: ओला चालकाची विष पिऊन आत्महत्या, ओला-उबर चालक आक्रमक;  सरकारला दिला इशारा
Ola Electric Scooter: ई-सायकलीच्या किंमतीत मिळणार ओलाची नवीकोरी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

महाराष्ट्रात सुरू असलेल्या कॅब चालकांच्या आंदोलनाने आता गंभीर वळण घेतले आहे. नालासोपारामध्ये ओला चालक सनोज सक्सेनाने आत्महत्या केल्यामुळे कॅब-रिक्षा चालक आक्रमक झाले आहे. त्यांचे आंदोलन आणखी मोठं होण्याची शक्यता आहे. सरकारी दरानुसार भाडे मिळावे, तसेच ओला, उबेर आणि रॅपिडो बाईक सेवांचा विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील रिक्षा संघटनाही संपात सहभागी झाली असून आजपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.

OLA-UBER: ओला चालकाची विष पिऊन आत्महत्या, ओला-उबर चालक आक्रमक;  सरकारला दिला इशारा
OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

चालकांचा आरोप आहे की, खासगी अ‍ॅप-आधारित कंपन्यांमुळे त्यांच्या उत्पन्नावर गदा आली असून शासनाने या सेवांवर नियंत्रण आणावे. ओला चालक सनोज सक्सेना यांची आत्महत्या ही आंदोलनाचा उद्रेक मानली जात आहे. कॅब आणि रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सरकारने तातडीने तोडगा काढावा अन्यथा यानंतर आंदोलन आणखी चिघळेल आणि त्यास जबाबदार सरकार असेल, असा इशारा आंदोलक संघटनांकडून देण्यात आला आहे.

OLA-UBER: ओला चालकाची विष पिऊन आत्महत्या, ओला-उबर चालक आक्रमक;  सरकारला दिला इशारा
Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com