Dhanshri Shintre
भारतात इलेक्ट्रिक कारपेक्षा इलेक्ट्रिक दुचाक्यांची मागणी वेगाने वाढली असून, अलीकडच्या वर्षांत अनेक नवे ब्रँड बाजारात उतरले.
जुलैमध्ये ओलाच्या विक्रीत मोठी घट झाली, तर इतर ब्रँड्सची विक्री वाढली; कंपनीने सेगमेंट लीडरपद गमावले.
जुलैमध्येही इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री जोरात झाली आहे. चला पाहूया, टॉप ५ सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँडची यादी.
जुलैमध्ये हिरो विडाची विक्री दुप्पट झाली असून कंपनीने १०,५०१ युनिट्स विकल्या, गेल्या वर्षीच्या ५,०६८ युनिट्सपेक्षा १०७% वाढ.
जुलैमध्ये एथर एनर्जीची विक्री वाढून १६,२५१ युनिट्स झाली, जी मागील वर्षीच्या १०,२१८ युनिट्सपेक्षा ५९.०४% जास्त आहे.
ओला तिसऱ्या स्थानावर परत आली आहे. जुलैमध्ये कंपनीने १७,८५२ युनिट्स विकल्या, जे मागील वर्षीच्या ४१,८०२ युनिट्सच्या तुलनेत ५७% कमी.
बजाज ऑटोने जुलैमध्ये चेतकच्या १९,६८३ युनिट्स विकल्या, गेल्या वर्षीच्या १७,७६५ युनिट्सच्या तुलनेत १०.८०% वाढ नोंदवली आहे.
टीव्हीएस आयक्यूब पुन्हा अव्वल स्थानी, जुलैमध्ये २२,२५६ युनिट्स विकल्या, गेल्या वर्षीच्या १९,६५५ युनिट्सच्या तुलनेत १३.२३% वाढ.