Budh Uday 2025: रक्षाबंधनच्या दिवसापासून 'या' राशींचं नशीब चमकणार; बुध ग्रहाचा उदय होऊन पैसाही मिळणार

Mercury rise financial gain: रक्षाबंधनाच्या दिवसापासून सुरू होणारा हा शुभ काळ, बुध ग्रहाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींसाठी धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि सुख-समृद्धी घेऊन येईल. चला तर मग, जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यांचे नशीब या शुभयोगाने उजळणार आहे!
Budh Uday in Kumbh Rashi
Budh Uday in Kumbh Rashisaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा युवराज मानलं जातं. बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, शिक्षण, व्यवसाय, तर्कशक्ती, संवादकौशल्य, अर्थव्यवस्था, एकाग्रता यांच्याशी संबंधित मानला जातो. बुधाच्या स्थितीत होणारा बदल केवळ वैयक्तिक आयुष्यावरच नव्हे तर देश-दुनियेतही मोठे परिणाम घडवतो.

बुध ग्रहाचा अस्त

आज म्हणजेच बुध ग्रह २४ जुलैच्या संध्याकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी कर्क राशीत अस्त होणार आहे. कर्क ही चंद्राची राशी असल्यामुळे बुधाचा अस्त हा सर्वा पातळीवर परिणाम करणारा ठरणार आहे. बुध ९ ऑगस्ट २०२५ रोजी म्हणजेच रक्षाबंधनच्या शुभ दिवशी पुन्हा कर्क राशीतच उदयास येणार आहे.

या काळात तीन राशींसाठी ही घटना अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशींना बुधाच्या उदयामुळे शिक्षण, करिअर, धनलाभ, कौटुंबिक सुख आणि वैयक्तिक प्रगतीचा लाभ होईल.

Budh Uday in Kumbh Rashi
Dashank Yog: 30 वर्षांनंतर न्यायाधीश शनी बनवणार अद्भुत योग; 'या' राशींना होणार धनलाभ

मेष रास

बुध मेष राशीच्या चतुर्थ भावात उदयास येणार आहे. या राशीतील लोकांसाठी हे अत्यंत अनुकूल काळ ठरणार आहे. बुध ग्रहाच्या या स्थितीमुळे घरात गोडवा वाढणार आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या समस्या सुटू लागतील. स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. घरच्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

मिथुन रास

या राशीच्या कुंडलीत बुध हा लग्न आणि चतुर्थ भावाचा स्वामी आहे. सध्या दुसऱ्या भावात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. या काळात धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुलणार आहे. शिक्षण क्षेत्रात चांगली संधी मिळणार आहे. व्यवसायात तयार केलेल्या योजना यशस्वी ठरणार आहे. घरगुती तणाव दूर होणार आहेत. नोकरीत पदोन्नती आणि जबाबदारीची संधी मिळेल.

Budh Uday in Kumbh Rashi
Shani Budh Vakri: ५०० वर्षांनी शनी-बुध ग्रह होणार वक्री; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

कन्या रास

कन्या राशीत बुध हा लग्न आणि कर्म भावाचा स्वामी आहे. तो सध्या लाभ भावात उदयास येणार आहे. हे संक्रमण कन्या राशींसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. आतापर्यंतच्या आरोग्याच्या समस्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणार आहे.या राशींच्या व्यक्तींना पगारवाढ किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

Budh Uday in Kumbh Rashi
Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध ग्रह करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com