Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikon Rajyog: जूनमध्ये 'या' ३ राशींचं नशीब पालटणार; पैशांसह तुम्हाला मिळणार पद-प्रतिष्ठा

Kendra Trikon Rajyog 2025 : प्रत्येक ग्रह एका ठरलेल्या काळानुसार त्यांच्या राशीत बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे राजयोगांची निर्मिती होते. येत्या काळात शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, कुंडली आणि नक्षत्रांना यांना खास महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर ग्रह त्याच्या रा राशी बदलतो, ज्यामुळे अशुभ आणि शुभ योग निर्माण होतात. या काळात एकाच राशीत दोन ग्रहांच्या येण्याने देखील राजयोगाची निर्मिती होते.

राक्षसांचा गुरु आणि संपत्ती आणि समृद्धीचा कारक शुक्र जूनमध्ये वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या गोचरमुळे तो केंद्र-त्रिकोण राजयोग निर्माण करणार आहे. विशेष म्हणजे शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राजयोगाचं महत्त्व अधिक आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

कन्या रास

मध्य त्रिकोण राजयोग राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकणार आहे. या घरात सुख आणि शांती राहणार आहे. या काळात तुमची आर्थिक परिस्थितीत सुधारणार आहे. नोकरीत बढतीसह पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. व्यवसायात मोठा नफा कमवू शकता. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहात.

वृषभ रास

तुमच्या राशीत केंद्र त्रिकोण राज योगाची निर्मिती होणार आहे. यावेळी बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्व सुधारू शकणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT