Budh Gochar Nai Duniya
राशिभविष्य

Budh Vakri: 10 नोव्हेंबरपासून 'या' राशींचं नशीब पालटणार; 12 महिन्यांनी बुध ग्रह चालणार वक्री चाल

Budh Vakri In Tula: ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार आणि संवाद यांचा कारक मानले जाते. जेव्हा बुध ग्रह 'वक्री' होतो तेव्हा त्याचा काही राशींना फायदा होतो. या राशी कोणत्या आहेत ते पाहूयात

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा व्यापार, अर्थव्यवस्था तसंच शेअर बाजार यांचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी बुध ग्रहाची चाल बदलते त्यावेळी या क्षेत्रांवर विशेष परिणाम होत असतो. १० नोव्हेंबर रोजी बुध ग्रह वक्री होईल तेव्हा तूळ राशीत वक्री चाल चालतील.

या बदलामुळे काही राशींच्या नशिबात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत आहेत. यावेळी काही राशींना धनलाभ होणार आहेत तर काहींना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींचा याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

धनु राशी

बुध ग्रहाची वक्री चाल धनु राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीपासून अकराव्या स्थानात वक्री असणार आहेत. त्यामुळे नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शेअर बाजार, सट्टा किंवा लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाची वक्री चाल सकारात्मक ठरू शकणार आहे. बुध ग्रह तुमच्या गोचर कुंडलीतील सुख-सुविधांच्या भावात वक्री असणार आहेत. त्यामुळे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग निर्माण होणार आहे. नवीन गुंतवणूक आणि योजनांमधून फायदा होणार आहे. पैतृक धन आणि संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाची वक्री चाल लाभदायक ठरणार आहे. बुध ग्रह तुमच्या गोचर कुंडलीतील धन आणि वाणीच्या भावात वक्री असतील आणि ते तुमच्या राशीचे स्वामी आहेत. उच्च शिक्षणासाठी योजना आखणाऱ्यांना पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. परदेशी संपर्कांमधून आयात-निर्यात व्यवसायात यश मिळू शकतं. वाणीमध्ये प्रभाव वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समरजीत घाटगे यांनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी, लवकरच शरदचंद्र पवार गटाला राम राम करणार

Mumbai Ahmedabad Expressway: गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा कारण

Glowing skin tips: व्हाईटहेड्स परत कधीच येणार नाहीत; या ६ सिक्रेट स्किन केअरचा करा वापर

Rajkummar Rao-Patralekha: आमच्या बाळाचं नाव काय? राजकुमार राव-पत्रलेखाने शेअर केलं त्यांच्या मुलीचं क्यूट नाव

ZP Election : पुण्यात अजित पवारांना जोरदार धक्का, झेडपीच्या निवडणुका लागताच दिग्गज नेत्याचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT