Neechbhang Rajyog saam tv
राशिभविष्य

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

Sun Planet Transit In Tula: ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग देखील तयार होतात. सूर्य देव उद्या 17 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे नीचभंग राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, ग्रह ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग देखील तयार होतात. यावेळी या राजयोगांचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो.

येत्या काळात सूर्य ग्रहाच्या गोचरमुळे एक खास राजयोग तयार होणार आहे. सूर्य देव उद्या 17 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे नीचभंग राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होणार आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींचे गोल्डन डे सुरु होणार आहेत, ते पाहूयात.

तूळ रास

नीचभंग राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. काही कामांमुळे तुमच्या बँक बॅलन्समध्येही वाढ होणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगलं राहणार आहे. उच्च अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात लाभ मिळू शकणार आहे.

कन्या रास

नीचभंग राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या राशीवरही नीचभंग राजयोग तयार होतोय. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकणार आहे. नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकते.

वृषभ रास

नीचभंग राजयोगाची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. सूर्यदेव यावेळी सहाव्या भावात विराजमान असणार आहे. तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आपला DNA शेतकऱ्याचा_मी आतापर्यंत कधीही शेतकरी विरोधी भूमिका घेतली नाही : विखे पाटील

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

Ladki Bahin Yojana eKYC Date: लाडकी बहीणींना eKYC कधीपर्यंत करता येईल?

Hair Growth Tips: केस गळणे ३० दिवसात थांबवा, ट्राय करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेले 'हे' हेल्दी फूड

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

SCROLL FOR NEXT