Mangla Aditya Rajyog 2026 saam tv
राशिभविष्य

Mangla Aditya Rajyog: 4 दिवसांनी बनणार आदित्य मंगळ राजयोग; या राशींच्या हाती लागणार पैसाच पैसा

Mangla Aditya Rajyog 2026: ११ मे रोजी मंगळ मेष राशीत प्रवेश करून सूर्याशी युती करणार आहे. यामुळे तयार होणारा मंगळादित्य योग मेष, सिंह, धनु आणि कुंभ राशींसाठी आर्थिक लाभ, करिअर प्रगती आणि भाग्यवृद्धीचे संकेत देणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ११ मे रोजी मंगळ मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे मंगळादित्य योग नावाचा एक विशेष योग तयार होणार आहे. हा योग तेव्हा तयार होतो जेव्हा मंगळ आणि सूर्य एकाच राशीत असतात. ज्योतिषशास्त्रात तो खूप प्रभावशाली मानला जातो. यावेळी या योगाचे महत्त्व आणखी जास्त असणार आहे.

मेष ही मंगळाची स्व-राशी आहे. तर सूर्य याठिकाणी उच्च राशीत आहे. परिणामी, या दोन ग्रहांच्या एकत्र येण्याने एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली योग तयार होतो. या विशेष योगाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. परंतु ही वेळ चार राशींसाठी विशेषतः भाग्यवान ठरू शकणार आहे.

मेष

मेष राशीसाठी तयार होणारा मंगळादित्य योग खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. बऱ्याच काळापासून अडकलेल्या पैशांची सुटका होण्याचे संकेत आहेत.

सिंह

हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी यश आणि नफा घेऊन येऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची संधी मिळू शकणार आहे. जुन्या कर्जातून सुटका होण्याची चिन्हं आहेत. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. एखाद्या मोठ्या कामातील यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.

धनु

हा योग धनु राशीच्या लोकांचं भाग्य मजबूत करणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ लागतील. अभ्यासात किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचारही करू शकता.

कुंभ

हा योग कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. पगारवाढ किंवा नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला धार्मिक किंवा आध्यात्मिक यात्रेला जाण्याची संधी देखील मिळू शकते

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foot Massage: रात्री पायाच्या तळव्याला लावा फक्त एक चमचा तूप; मिळतील आश्चर्यकारक फायदे

NCMC Card Update : राज्यातील महिलांना सरकारचं दिवाळी गिफ्ट, NCMC कार्डबाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; बॉम्बे हायकोर्टासह अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही लक्ष्य

BDD Homes : बीडीडी चाळीतील रहिवाशांचे घराचे स्वप्न पूर्ण; ५५७ कुटुंबांना मिळाली हक्काची घरे

Soap Hacks : उरलेला साबण फेकून देताय? घरातील कामांसाठी असा करा पुनर्वापर

SCROLL FOR NEXT