Swati Nakshatra google
राशिभविष्य

Swati Nakshatra: स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणत्या गोष्टीत करियर करावे?

Swati Personality: स्वाती नक्षत्राचे स्वभाव, करिअर आणि आरोग्य समस्यांविषयी जाणून घ्या.

Saam Tv

स्वाती नक्षत्र -

राहू या ग्रहाच्या अमलाखाली येणारे हे नक्षत्र आहे. या व्यक्तीचा स्वभाव बुद्धिमान,द्रष्टा, उच्चभिलाषी, तौलनिक अभ्यास करणारे, विनम्र पण स्पष्ट वक्ता, भावनात्मक, संवेदनाशील, लाघवी, माणसांना समजून घेणारे, दुसऱ्यांच्या ऐकून घेणारे, मित्रमंडळीत रमणे यांना आवडते. मनातली गोष्ट पटकन कोणाला सांगत नाहीत. काही वेळेला पटकन कोणावरही रुसतात.

जीवनाचा खोलवर विचार करणारे, स्मरणशक्ती चांगली, सारासार विवेक असणारे, चारित्रा बद्दल अत्यंत जागरूक ,प्रवासाची आवड, स्त्रियांबाबत काहीशी संकुचित वृत्ती असते. व्यवसायमध्ये अनेक व्यवसाय एकाच वेळी हातात घेतात. यशस्वी, आनंदी, हौशी, रसिक वृत्तीने जगणारे नक्षत्र आहे. बिघडल्यास स्वार्थी आणि कंजूस वृत्तीने राहणारे. धाडसी आणि हट्टी असे होतात.

नोकरी व्यवसाय -

रासायनिक पदार्थांचे विक्री मद्याचा व्यवसाय मध्ये उत्तम यश, ऑटोमोबाईल, फोटोग्राफी, एक्स-रे, इलेक्ट्रिकल सामान, सर्जरी उपकरणे, काच सामान, टॉयलेटचे सामान, प्लास्टिक उद्योग, सिल्क कशीदा काम, फॅन्सी स्टोर विक्रेते, बारबाला, डान्सर, आर्टिस्ट, अचानक आपल्या क्षेत्रात चमकतात आणि लुप्त होतात.

रोग आजार -

या नक्षत्रावर त्वचा आंतपूच्छा, मूत्रपिंड, गर्भाशय हे अवयव नेतात त्यामुळे यांना एक्झिमा, त्वचारोग, रक्तगाठी, अल्सर गर्भाशयाचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, कंबर दुखणे आणि रक्तदाब असे रोग उद्भवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

Amol Khatal:संगमनेरमध्ये राडा! भर कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला|Video

SCROLL FOR NEXT