Saam Tv
तुम्हाला उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान करायचा असेल तर तुम्ही काश्मिरमधील काही सुरक्षित ठिकाणांना भेट देऊ शकता.
काश्मिरमधल्या काही भागात शांतता व सुरक्षितता आहे. त्यामुळे तुम्ही फिरण्यासाठी पुढील ठिकाणांचा विचार करू शकता.
श्रीनगर हे पर्यटकांसाठी सर्वात प्रसिद्ध आणि सुरक्षित स्थळ मानलं जातं. तिथे तुम्ही मुगल गार्डन्स निशात किंवा शालीमार बाग अशा ठिकाणांना भेट देऊ शकता.
उन्हाळ्यात थंड हवेचा अनुभव आणि विविध खेळांचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही गुलमर्ग या प्रसिद्ध ठिकाणाला भेट देऊ शकता.
पहलगाम हे ठिकाण पर्यटकांचे प्रचंड आवडचे ठिकाण मानले जाते. परंतू नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्यामुळे हे ठिकाण असुरक्षित मानलं जात आहे. त्यामुळे सध्या या भागात फिरणे टाळले तर योग्यच होईल.
ट्रेकिंग, ग्लेशियर सफारी आणि फॅमिलीसोबत फिरण्यासाठी सोनमर्ग हे ठिकाण योग्य आहे.
काश्मिर मधील सगळ्यात प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिर हे कटरा या ठिकाणी आहे.
सुंदर वातावरण उंच उंच डोंगर पाहण्यासाठी तुम्ही किश्तवार या ठिकाणाला भेट देऊ शकता.
शंखपाल मंदिर हे रामबन येथील प्रसिद्ध मंदिर आहे. इथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.