Horoscope Today  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : थोडासा अडचणीचा दिवस असणार; ५ राशींच्या लोकांचे हित शत्रू वाढतील, वाचा रविवारचं राशीभविष्य

Sunday Horoscope in Marathi : आज काही राशीच्या लोकांसाठी थोडासा अडचणीचा दिवस असणार आहे. तर ५ राशीच्या लोकांचे हित शत्रू वाढणार आहेत.

Anjali Potdar

आजचे पंचांग

रविवार,२५ मे २०२५,वैशाख कृष्णपक्ष,शिवरात्रि.

तिथी-त्रयोदशी १५|५२

रास- मेष

नक्षत्र-अश्विनी

योग-सौभाग्य

करण-वणिज

दिनविशेष-त्रयोदशी वर्ज्य

मेष - मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतील. एकटेच फिरायला जावं असेही वाटेल. भ्रमंती वाढेल. वाणीवर निमंत्रण ठेवल्यास दिवस आनंदी आहे.

वृषभ - परदेशी निगडित नियोजन होतील. कलाकार लोकांना थोडा अडचणीचा दिवस आहे. मनोबल वाढवावे लागेल. पैसा खर्च होईल.

मिथुन -जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. स्नेहभोजनाचे योग आहेत. सुन जावयांच्या कडून फायदा होईल. दिवस अनेक लाभ घेऊन आलेला आहे.

कर्क - बढतीचे योग आहेत. जितके फिराल तेवढी प्रगती आज दिसते आहे. कामाचा ताण वाढता असेल पण त्यामध्येही आनंद मिळवाल. दिवस संमिश्र आहे.

सिंह - तीर्थक्षेत्रि भेटी होतील. "मानो यां ना मानों" असा दिवस आहे. भगवंतावरचा विश्वास दृढ होईल. प्रेमात यश मिळेल. आनंदी दिवस आहे. रवी उपासना करावी.

कन्या - बौद्धिक कामांना प्राधान्य द्या. नको त्या गोष्टींच्या मागे लागून आज मानसिकता खराब करून घेऊन नका. पैशाची निगडित व्यवहार जपून करावेत.

तूळ -विवाह उत्सुकंचे विवाह ठरतील. संततीच्या कौतुकास्पद गोष्टी कानावर येतील. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय होतील. दिवस चांगला आहे.

वृश्चिक - दोन डगडींवर पाय ठेवून पुढे जाल. हित शत्रू वाढतील. मात्र सर्वांवर आज पुरून उराल. तब्येत मात्र जपावी. नाहक त्रास करून घेऊ नका.

धनु -दत्त उपासना फलदायी ठरेल. शेअर्समधील गुंतवणूक योग्य राहील. कलाकारांना दिवस चांगला आहे. सुकर आणि सुलभ घटना आज घडतील.

मकर - जुने घर असेल तर डागडुजी मध्ये आज व्यस्त रहाल. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पुढे जाल. कुटुंबीयांच्या बरोबर आनंद उपभोगाल. दिवस चांगला आहे.

कुंभ - भावंडे आपल्याला सहकार्य करतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. प्रवासातून फायदा होईल. संशोधनात्मक कार्यात प्रगती होईल.

मीन - सुवर्ण खरेदी होईल. गुंतवणूक करावीशी वाटेल. मात्र जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी. सुखाला पदर सुटतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT