Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Sunday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल. तर काहींना रविवार गेमचेंजर ठरणार आहे.

Anjali Potdar

पंचांग

रविवार,१४ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष,

शुक्र पूर्व लोप.

तिथी-दशमी १८|५०

रास-कन्या २१|४२ नं. तुला

नक्षत्र-हस्त

योग-सौभाग्य

करण-विष्टीकरण

दिनविशेष-१९ नं. चांगला

मेष - महत्त्वाची कामे दुपारनंतर केलेली बरे राहील. कारण नसताना आरोग्याच्या तक्रारी उदभवतील. आहारावर विशेष लक्ष केंद्रित करून मन स्वच्छ, चांगले ठेवा.

वृषभ - संततीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. तुम्ही घेतलेले निर्णय अंदाज योग्य दिशेने आहेत याची तुम्हाला खात्री होईल. शेअर्स आणि लॉटरीमध्ये भरपूर पैसा आज मिळेल.

मिथुन - प्रॉपर्टीचे सौख्याला दिवस उत्तम आहे. जागेचे प्रश्न जर दिरंगाई मध्ये अडकले असतील तर आज ते मार्गी लागतील. वाहन सौख्यही चांगले आहे. दिवस उत्तम आहे.

कर्क - नोकरी व्यवसायामध्ये दैदिप्यमान प्रगती कराल. समाधानकारक सर्वच ठिकाणी स्थिती राहील.मनस्वास्थ्य उत्तम राहील. जवळच्या नातेवाईकांच्या सहकार्याने मैलाचा दगड पार कराल.

सिंह - व्यवसायामध्ये अनिर्णित राहिले आहेत त्याचे निर्णय आज होतील. आर्थिक अडचणीतून मार्ग निघेल. काही लना अचानक धनलाभाची सुद्धा शक्यता आहे. दिवस चांगला आहे.

कन्या - आपल्या राशीला सतत काही ना काळजी आणि चिंता आपल्या असतेच. आज मात्र आजचा दिवस याला अपवाद आहे.मन आनंदी आणि आशावादी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभणार आहे.

तूळ - दैनंदिन कामे रखडतील. प्रवास हे शक्यतो टाळावे. प्रवासामध्ये काहीतरी कटकटी मागे लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या ऐवज आणि जिन्नस सांभाळा. परदेश गमनाचे नियोजन होईल.

वृश्चिक - महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडणार आहेत. आरोग्य सुध्दा उत्तम राहील. विविध लाभ आज तुमच्या राशीला मिळतील. काळजीचे कारण नाही दिवस चांगला आहे.

धनु - तुमचा कार्यक्षेत्रामध्ये एखादी गरुड झेप नक्की घ्याल. आपले मनोबल आणि आत्मविश्वासावर पुढे जावे. आपल्या सहकाऱ्यांची योग्य ती साथ हीच आजच्या दिवसाची जमेची बाजू ठरेल.

मकर - ज्या दिवसांची अतिव वाट पाहत आहात, अशी एखादी महत्त्वाची घटना घडेल. भारतात काहींना तीर्थक्षेत्र स्थानी सुद्धा भेटीचे योग आहेत. शंकराची उपासना विशेषत्वाने करावी.

कुंभ - कोणाचेही सहकार्याची अपेक्षा आज नकोच. "भीक नको कुत्र आवर" असा काहीसा दिवस आहे. वादविवाद टाळून पुढे जाणे आज गरजेचे आहे.

मीन - भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभेल.इतरांवर तुमचा प्रभाव चांगला राहील. व्यवसायामध्ये नवीन गोष्टीत पाय रोवाल. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत; प्रकाश महाजनांची जहरी टीका

Airoli Katai flyover: नवी मुंबईतून काही मिनिटांतच कल्याण-डोंबिवलीत पोहोचता येणार; ऐरोली-काटईदरम्यानचं सर्वात मोठं काम पूर्णत्वाला...

२० षटकार, ११ चौकार....वर्ल्डकपच्या आधी हार्दिक पंड्याची त्सुनामी, VIDEO

Cauliflower Potato Bhaji Recipe : ढाबा स्टाइल फ्लॉवर बटाट्याची चमचमीत भाजी, अवघ्या १० मिनिटांत मुलं जेवण करतील फस्त

Maharashtra Politics: शिवसेनेचा दे धक्का, संदीप धुरींनंतर आणखी एका शिलेदारानं सोडली राज ठाकरेंची साथ

SCROLL FOR NEXT