horoscope  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : जोडीदाराशी भांडण होणार; ५ राशींचे लोक घरगुती गोष्टीत अडकून पडणार, वाचा राशीभविष्य

Sunday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांचे जोडीदाराशी भांडण होईल. तर काही जण घरगुती गोष्टीत अडकून राहतील.

Anjali Potdar

आजचे पंचांग

रविवार,१४ सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,कालाष्टमी,अष्टमी श्राध्द,मध्याअष्टमी श्राध्द.

तिथी-अष्टमी २७|०७

रास-वृषभ २०|०४ नं. मिथुन

नक्षत्र- रोहिणी

योग-वज्र ०७|३५

सिद्धियोग २८|५५

करण- बालव

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - पैसे जसे येतात तसे त्याच्या जाण्याच्या गोष्टी ठरलेल्या असतात. आज जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तिखट, मसालेदार खाण्यावर विशेष जीव जडेल.

वृषभ- कलाकारांना चांगल्या संधी प्राप्त होतील. सकारात्मक आणि प्रभावी असे आज आपले व्यक्तिमत्व राहील. आपला सल्ला इतरांना मोलाचा ठरेल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन - व्यवसायामध्ये थोड्या अडचणी निर्माण होतील. मनस्ताप पाडणाऱ्या घटना घडतील. दूरचे नियोजन काही असेल तर त्यामध्ये आज यश मिळणार आहे. कटकटींवर मात करून पुढे जाल.

कर्क- धनाशी निगडित व्यवहार घडतील. गुंतवणूक फायद्याची ठरेल. जुन्या केलेल्या पैशाचा व्यवहारातून आज दुप्पट मोबदला मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे.

सिंह - कार्यक्षेत्रामध्ये विशेष प्रगती कराल. बढतीचे प्रगतीचे योग आहेत. आपल्या सहकाऱ्यांच्याकडून केलेल्या कामाची आपल्याला पावती मिळेल. राजकारणात यश मिळेल.

कन्या - सोपा आणि सहज आजचा दिवस आहे. सुलभतेने सर्व गोष्टी होतील. यश म्हणजे काय हे समजेल. मोठ्या प्रवासाचे योग आहेत. विष्णू उपासना करावी.

तूळ - अचानक धनलाभ होतील. सरकारी कामांमध्ये मात्र आज व्यत्यय संभवतो आहे. गूढ शास्त्रामध्ये विशेष प्रगती होईल. एकटेपणाची भावना निर्माण होईल.

वृश्चिक - जोडीदाराबरोबर विनाकारण अबोला संबोधतो आहे. एकमेकांचा कौल घेऊन पुढे गेलात तर दिवसभरात मनस्वास्थ्य मिळेल. कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. दिवस बरा आहे.

धनु - उष्णतेचे विकार होतील. संकटांची मालिका सुरू होते की काय असा दिवस असेल. आजोळी प्रेम मिळेल. जीवनामधल्या अंदाधुंदीची झळ लागेल.

मकर - विष्णू/ शिव उपासना आज चांगली ठरेल. आपल्या मधील वेगळेपण इतरांना जाणवेल. नव्या नव्या कल्पनाने भरलेला आजचा दिवस आहे. कलाकार थिएटर गाजवतील.

कुंभ - घरगुती गोष्टींमध्ये अडकून पडाल. मात्र काही जबाबदाऱ्या असतात ज्या आज पेलावे लागतील. शेतीवाडी, प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार होतील.

मीन - भावंड सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. शेजाऱ्यांच्या कडून सहकार्य मिळेल. जवळच्या ठिकाणी देवधर्मासाठी प्रवास होतील. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT