Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : लाईफ पार्टनरशी वाद-विवाद होण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Sunday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांचा पार्टनरशी वाद होण्याची शक्यता आहे. तर ५ राशींच्या लोकांना सतर्क राहावे लागेल.

Anjali Potdar

पंचांग

रविवार,२८ डिसेंबर २०२५,पौष शुक्लपक्ष,दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सवारंभ.

तिथी-अष्टमी १२|००

रास-मीन

नक्षत्र-उत्तराभाद्रपदा

योग-वरीयान

करण-बवकरण

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - काहीतरी गडबडीच्या घटना घडतील असा दिवस सांगतो आहे. उतावळेपणा त्रासदायक ठरू शकेल. निर्णय घेताना योग्यच घ्या. वाहनांपासून धोका संभवतो आहे. काळजी घ्या .

वृषभ - प्रेमामध्ये सारं काही अलबेल चालू आहे असे वाटत असताना "दुधात मिठाचा खडा" पडेल. प्रियकरा बरोबर थोडीशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. आपल्या राशीचा गुण गोड बोलण्याचा असल्यामुळे आज तुम्ही समोरच्याला समजून घेतल्यामुळे दिवस चांगला जाईल.

मिथुन - सामाजिक क्षेत्र आणि वक्तृत्व यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या बोलण्यामुळे इतरांना आपलेसे कराल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम कराल.

कर्क - प्रेमामध्ये गहिरे पण येईल. संतती सौख्य, नातवंड सौख्य यासाठी दिवस चांगला आहे. उपासनेच्या माध्यमातून काहीतरी चांगले घडेल. चांगल्या वार्ता कानी येतील.

सिंह - मोडेन पण वाकणार नाही असा आपला बाणा आहे आज मात्र इतके कुणात गुंतूच नका की ज्याच्यामुळे त्रास होईल. "आपण भले, आपले काम भले" असा दिवस काढल्यास कामे सुरळीत होतील.

कन्या - कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. नको असलेल्या कटकटी मागे लागल्या असतील तर आज त्यातून अलगद बाहेर याल. संसारिक समाधान लाभेल. दिवस चांगला आहे.

तूळ - या राशीच्या स्त्रियांना स्त्रीविषयक आजार होतील. जवळच्या व्यक्तीकडून घातपात झाल्यासारख्या गोष्टी होतील. महत्त्वाच्या ऐवज, जिन्नस ,पैसे, चोर आणि चोरीपासून स्वतःला संभाळणे आज गरजेचे आहे .

वृश्चिक - कुलदेवतेच्या आशिर्वादाने दिवस उजळून निघेल. मनात ठरवलेल्या गोष्टी घडतील. क्रीडा क्षेत्रात विशेष प्रगती घेऊन आलेला दिवस आहे काहीतरी धाडसाचे, धडाडीचे काम आज कराल.

धनु - शाकंबरी देवीचा उत्सव सुरू होत आहे. घरामध्ये एखादा मंगल कार्य होईल. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती वाढेल. देवी उपासनेने दिवस समृद्ध होईल. मातृसख चांगले आहे.

मकर - एक वेगळा हुरूप आणि उमेद आज कामासाठी असेल. मोठ्या व्यक्तींच्या सहकार्याने पुढे जाल. व्यवसायामध्ये नवीन काहीतरी घडामोडी घडतील. संशोधनात्मक कार्य होईल.

कुंभ - न बोलता सारे काम आज कराल. कुटुंबाची साथ चांगली असेल. खाण्यापिण्याची मांदियाळी असेल. तब्येत मात्र जपावी लागेल. विशेषतः जोडीदाराची काळजी घ्या .

मीन - मीपणा सोडून आज वागणे चांगले असेल अर्थात मीपण जपाल, स्वतःमध्ये मग्न असाल एक आनंददायी प्रवासाची सुरुवात म्हणजे आजचा दिवस आहे. घेतलेले निर्णय योग्य मार्गावर लावण्यासाठी विशेष प्रयत्नशील असाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

Maharashtra Live News Update: ठाण्यात प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर.. परिसरात घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT