Shukra Varun Yuti saam tv
राशिभविष्य

October Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये सूर्य-शनीसोबत 6 ग्रह बदलणार रास; 'या' राशी जगणार राजासारखं आयुष्य

October 2025 Grah Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिना हा ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने अत्यंत खास असणार आहे. या महिन्यात सूर्य आणि शनीसह तब्बल ६ मोठे ग्रह (Six planet transits in October) एकाच वेळी आपली स्थिती बदलणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ऑक्टोबर महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात सूर्यसह तब्बल सहा ग्रहांची स्थिती बदलणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे ३ ऑक्टोबर रोजी शनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहेत. त्याच दिवशी बुध तूळ राशीत प्रवेश करेल.

यानंतर २४ ऑक्टोबर रोजी बुध तूळ सोडून मिथुन राशीत गोचर करणार आहे. त्याचप्रमाणे ९ ऑक्टोबरला शुक्र कन्या राशीत जाणार आहे, तर १७ ऑक्टोबरला सूर्याचा गोचर तूळ राशीत होणार आहे. महिन्याच्या शेवटी २७ ऑक्टोबर रोजी मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. गुरु अतिचारी गती करत १८ ऑक्टोबर रोजी आपल्या उच्च राशी कर्केत गोचर करणार आहेत.

ऑक्टोबरमध्ये बदलणाऱ्या या ग्रहांच्या गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यावर चांगला परिणाम होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कर्क राशि

ऑक्टोबरमध्ये कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनेक सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल फळं मिळणार आहे. सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभणार आहे. कौटुंबिक जीवनातही समाधानाचे क्षण मिळणार आहेत. या महिन्यात गुरु तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने मानसिक समाधान, सुख आणि ज्ञानवृद्धी होणार आहे.

तूळ राशि

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना परदेशाशी संबंधित संधी आणणारा ठरणार आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते किंवा परदेशी व्यापाराशी संबंधित नवीन मार्ग खुले होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आणि प्रेमसंबंधांमध्ये सौहार्द निर्माण होणार आहे. आर्थिक चिंता कमी होण्याची शक्यता आहे.

मकर राशि

मकर राशीसाठी ऑक्टोबर करिअर आणि आर्थिक क्षेत्रात उत्तम परिणाम घडवून आणेल. तुमच्या कार्यक्षमतेत आणि ऊर्जेत वाढ होईल. महत्त्वाचे कामे वेळेत पूर्ण करता येतील. काही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळेल. आधी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. पितृ व्यवसायातूनही नफा होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Vijay Rally Stampede : १७ महिला, ९ मुलांसह ३९ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू, ५१ जण ICU मध्ये, थलापति विजयच्या रॅलीत अनर्थ

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, ट्रकची टेम्पोला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू

IND vs PAK Final: ‘सचिन-कोहली’सारखं बुमराह पाकिस्तानला नडणार, म्हणून आज बूम-बूम ठरणार ‘गेम चेंजर’

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा जिल्हापरिषद शाळांना मोठा फटका

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी ट्राय करा 'ही' रेसिपी, महिनाभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT