Singh Rashi Personality  Saam TV
राशिभविष्य

Singh Rashi Personality : कामात चतुराई, उदार अन् उमदा स्वभाव; सिंह राशीचे लोक नेमके कसे असतात? जाणून घ्या

Leo Rashi personality : सिंह राशीचे लोक नेमके कसे असतात, जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि गुण

Anjali Potdar

सिंह ही राशीचक्रातील पाचवी रास. रवि या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. यामध्ये एकूण तीन नक्षत्र येतात. मघा ४ चरण, पूर्वा ४ चरण आणि उत्तराचा एक चरण. अग्नी तत्वाची रास. पुरुष रास आहे. स्थिर राशी आहे. तसेच या राशीला वंध्या रास असेही म्हटले जाते. या लोकांना अधिकार गाजवायला आवडतो. स्तुतिप्रिय असतात.

भरपूर स्फूर्ती तत्त्वनिष्ठता, आकर्षकपणा, आशावाद यांनी भरलेली ही रास. जिद्दीने उभारी ठेवतात. "हिंम्मत यें मर्दां"अशी रास आहे. खूप काही गोष्टी मिळवायला या माणसांना आवडतात. ताकत आणि चपळाई सुद्धा भरपूर आहे. या राशीला खरंतर राज राशी म्हटले आहे.

ही रास नेतृत्व करणारी, स्पष्ट बोलणारी, शत्रूंवर विजय मिळवणारी, अग्नी तत्वाची, पित्त प्रकृतीची, योगकारक अशी राशी आहे. तरतरीत आणि भारदस्त व्यक्तिमत्व या लोकांचे असते. उदार उमदा स्वभाव, अभिमानी आणि मातृभक्त हे लोक असतात.

शृंगार, नटणे मुरडणे मध्ये विशेष रस नसतो. साधू संतांची मात्र नम्रपणे वागतात. मिथुन राशीसोबत यांचं चांगलं जमतं. या राशींची मात्र एक लंगडी बाजू आहे, ती म्हणजे भावनेंवर ताबा नसतो. नातेसंबंध, स्व व्यक्तिमत्व, आपल्या व्यक्तींबद्दल हे लोक खूपच पजेसिव असतात.

यांच्या अधिकारात मात्र कोणी ढवळाढवळ करावी हे यांना आवडत नाही. एकनिष्ठ असतात. पाठीच्या मणक्याची रास. या राशीचे पूर्व दिशेला स्वामित्व आहे. तसा विचार केला तर हे लोक सिंहाच्या चालीचे असतात. म्हणजे छाती पुढे काढून चालणे.

यांची मुख्य खासियत म्हणजे सिंह कटी. कंबर बारीक असते, डवलदार चालत असतात. जांभई देताना जबडा पूर्ण दिसतो. सिंह राशीचे लोक खूप पटपट चालत नाहीत. पाण्यात चालणे, बॉक्सिंग व्यायाम हे यांना आवडतं. नियमित योग आणि व्यायाम मात्र हे करतीलच असे नाही.

नाजूक साजूक कुठल्या गोष्टी आवडत नाहीत. मनमोकळी रास. जबाबदारी घेऊन काम करणारे असतात. स्तुतीने हुरळून जाणारे हे लोक असतात. आई-वडील, मुले, नातेवाईक, वडिलोपार्जित इस्टेट, आत्या या सगळ्यांशी हे लोक कनेक्ट असतात. यांच्या कामात चतुराई असते.

रोग आजाराचा विचार केला, तर या राशीचा अंमल हृदयावर, पाठ, पाठीचा कणा, रुधिराभिसरण संस्था यांना त्रास होऊ शकतो. पित्त प्रकृती असते. हाडांचे आजार यांना होऊ शकतात.

अधिकार पदाच्या नोकऱ्या यांना लागतात, क्लासवन ऑफिसर, सरकारी नोकरीत असू शकतात. अनेकांचे पोशिंदे असतात. अर्थात स्वतःचा व्यवसाय करण्याकडे यांचा विशेष कल असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT