Ardhakendra Yog saam tv
राशिभविष्य

Ardhakendra Yog: शनी-यम बनवणार अर्धकेंद्र राजयोग; 22 जानेवारीपासून 'या' राशींच्या घरी पडणार पैशांचा पाऊस

Shani Pluto Ardhakendra Yog: प्लुटो नवग्रहात नसतानाही प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. 22 जानेवारी रोजी सकाळी 9.24 वाजता शनी आणि प्लुटो एकमेकांपासून 45 अंशांवर असणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. या नऊ ग्रहांमध्ये शनीदेवाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. शनी देव एका राशीमध्ये जवळपास अडीच वर्ष राहतो. याशिवाय प्लूटो हा यम ग्रह मानला जातो. नवग्रहात नसतानाही प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो.

22 जानेवारी रोजी सकाळी 9.24 वाजता शनी आणि प्लुटो एकमेकांपासून 45 अंशांवर असणार आहेत. ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकणार आहे. तर काही राशींच्या व्यक्तींच्या मनातील सर्व इच्छा या काळात पूर्ण होऊ शकणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या प्लूटो मकर राशीत आहे. तो एका राशीत सुमारे 17-18 वर्षे राहतात. प्लूटोने 1 नोव्हेंबर 2021 रोजी मकर राशीत प्रवेश केला आणि आता 27 मार्च 2039 पर्यंत या राशीत राहणार आहे. या अर्धकेंद्र योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी शनी आणि प्लुटो यांनी तयार केलेला अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवू शकणार आहेत. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला नोकरीच्या अनेक ऑफर मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे.

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठीही अर्धकेंद्र खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. इमारत, जमीन, वाहनाचे सुख मिळू शकणार आहे. नोकरीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तुम्हाला संपूर्ण आरोग्य सहकार्य मिळू शकणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी प्लुटो-शनीमुळे तयार झालेला अर्धकेंद्र योगही लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. तुम्हाला व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. तुम्ही भरपूर यश मिळवू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT