Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar : मार्च महिन्यात मीन राशी शनी गोचर, चांदीच्या पावलांनी चालणार शनीदेव; 'या' राशींच्या व्यक्ती जगणार राजासारखं आयुष्य

Shani Gochar 2025: 29 मार्च 2025 रोजी मीन राशीतून शनीचे भ्रमण होणार आहे. शनिदेव आपली मूळ त्रिकोणी राशि कुंभ राशी सोडून धनु राशीत प्रवेश करतील.

Surabhi Jayashree Jagdish

२०२५ हे वर्ष ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फार महत्त्वाचं मानलं जातंय. कारण या वर्षात अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. यामध्ये न्याय देवता शनी देवाचाही समावेश आहे. यावर्षी 29 मार्च 2025 रोजी मीन राशीतून शनीचे भ्रमण होणार आहे. शनिदेव आपली मूळ त्रिकोणी राशि कुंभ राशी सोडून धनु राशीत प्रवेश करतील.

शनीचे हे गोचर 3 राशीच्या लोकांसाठी अद्भूत म्हणता येईल. याचं कारण म्हणजे शनी देव त्यांच्या राशीत चांदीच्या पायावर चालणार आहे. जेव्हा शनी तांबे किंवा चांदीच्या पायावर चालतो तेव्हा ते शुभ परिणाम देतं. त्यामुळे या काळात काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचं गोचर खूप शुभ असणार आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहे. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकणार आहे. नोकरीची मोठी संधी मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल.

वृश्चिक रास

मीन राशीतील शनीचं गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही लाभदायक ठरणार आहे. तुमच्या पाचव्या घरात शनी भ्रमण करणार आहे. तुमच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण येणार आहे. हा काळ तुमच्या करिअरसाठी चांगला राहणार आहे. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता.

कुंभ रास

शनीचं गोचर कुंभ राशीच्या लोकांना धनवान बनवू शकणार आहे. शनी तुमच्या दुसऱ्या घरात जाणार आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो. कोर्टाच्या केसेसमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. येत्या काळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे हिंगोलीत जोरदार निदर्शने

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

Blood Pressure : बीट की डाळिंब? BP नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता ज्यूस फायदेशीर

Vitamin B12 deficiency: शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास हातांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

SCROLL FOR NEXT