Shani Dev Saam TV
राशिभविष्य

Shani Dev: शनीदेव मार्चनंतर 'या' राशींना अजिबात देणार नाहीत माफी; धनहानीसोबत फसवणूक होण्याचीही शक्यता

Shani Dev: शनी एका राशीमध्ये सुमारे अडीच वर्ष राहतो. आता २०२५ हे वर्ष सुरु झालं असून या काळात शनी देव त्यांच्या राशी मध्ये बदल करणार आहेत

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी. शनी एका राशीमध्ये सुमारे अडीच वर्ष राहतो. आता २०२५ हे वर्ष सुरु झालं असून या काळात शनी देव त्यांच्या राशी मध्ये बदल करणार आहेत.

शनी देवाचं गोचर प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर काही ना काही परिणाम करणार आहे. २०२५ वर्षात शनी देवाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या आयुष्यात संकटांचा काळ सुरु होण्याची शक्यता आहे. यावेळी काही राशींवर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे.

मेष रास

या वर्षी शनीची सर्वात कठोर नजर तुमच्या राशीवर असणार आहे. 29 मार्च 2025 पासून मेष राशीवर शनीची धैय्या सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्ष तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरदार, गरीब, मजूर, दुर्बल यांना त्रास देऊ नये.

सिंह रास

तुमच्या राशी स्वामी शनी खूप कोपण्याची शक्यता आहे. सूर्य तुमच्या राशीचा स्वामी आणि शनिदेवाचा पिता आहे. असे असूनही शनीचा सूर्य देवाशी संबंध नाही. त्यामुळे या वर्षी काळजी घ्या. इतरांबद्दल वाईट बोलू नका. महिलांचा आदर करा. चुकूनही कोणाची फसवणूक करू नका. या काळात तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

तूळ रास

शनीची आवडती राशी असल्याने या राशींच्या व्यक्तींनीही काळजी घ्यावी. तुमच्याकडून काही चुका होऊ नयेत अशी शनीची इच्छा आहे. शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी इतरांबद्दल वाईट बोलणं तुम्ही टाळलं पाहिजे. तुम्ही इन्स्टाग्राम किंवा फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्टिव्ह असाल तर काळजी घ्या.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT