Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar: मार्चमध्ये शनीचा डबल अटॅक, 2 वेळा बदलणार चाल; 'या' राशींना लागणार जॅकपॉट

Saturn double impact March : २०२३ नंतर २०२५ मध्ये शनि ग्रह भ्रमण करणार आहे. २९ मार्च रोजी शनि गोचर करेल आणि मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी सध्या कुंभ राशीत आहे आणि कुंभ राशीतून बाहेर पडल्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये सर्व नऊ ग्रहांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये शनी देवाला देखील खास महत्त्व आहे. या ग्रहांमध्ये सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी. शनी एका राशीमध्ये जवळपास अडीच वर्ष राहतो. २०२३ नंतर २०२५ मध्ये शनि ग्रह भ्रमण करणार आहे. २९ मार्च रोजी शनि गोचर करेल आणि मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी सध्या कुंभ राशीत आहे आणि कुंभ राशीतून बाहेर पडल्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे.

शनी अस्त देखील होणार

शनि गोचर करण्यापूर्वी अस्त होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी शनि अस्त होणार आहे. यावेळी मार्च महिन्यात तो अस्त राहणार आहे. मार्चमध्ये शनीच्या स्थितीत झालेल्या या दोन बदलांचा सर्व १२ राशींवर मोठा परिणाम होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा लाभ होणार आहे.

वृषभ रास

शनीच्या बदलत्या हालचालींमुळे वृषभ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकणार आहेत. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. जुनाट आजार संपणार आहेत. कुटुंबात सकारात्मक वातावरण राहणार आहे. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे.

कर्क रास

शनीचं गोचर आणि अस्त कर्क राशीवर चांगला परिणाम करू शकणार आहेत. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन संधी मिळणार आहेत. नोकरीत बढतीची वाट पाहणाऱ्यांना आता चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक पैलू देखील मजबूत होणार आहेत. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

मकर रास

मकर राशीच्या लोकांना शनी चांगले परिणाम देणार आहे. नवीन स्रोतांकडून पैसे येण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवणार आहात. जुन्या समस्यांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे.

धनु रास

शनीच्या गोचरमुळे धनु राशीच्या लोकांना मोठा आर्थिक फायदा होईल. या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याती शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होऊ शकतं. जीवनात सुखसोयी आणि सुविधा वाढतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT