Shani Gochar 2025 Saam Tv
राशिभविष्य

Shani Gochar: नव्या वर्षात शनी देव गुरुच्या राशीत करणार गोचर; 'या' राशींवर राहणार शनीचा आशीर्वाद, पगारवाढही होणार

Shani Gochar 2025: कर्म दाता, न्यायाधीश आणि दंडाधिकारी शनिदेव 2025 मध्ये राशी बदलणार आहेत. 29 मार्च 2025 रोजी शनिदेव स्वतःचे कुंभ राशी सोडून देवगुरू मीन राशीत प्रवेश करणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. २०२५ हे वर्ष ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फार महत्त्वाचं मानलं जातंय. यावेळी अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. यामध्ये शनी देवाचा देखील समावेश आहे. कर्म दाता, न्यायाधीश आणि दंडाधिकारी शनिदेव 2025 मध्ये राशी बदलणार आहेत. 29 मार्च 2025 रोजी शनिदेव स्वतःचे कुंभ राशी सोडून देवगुरू मीन राशीत प्रवेश करणार आहेत.

वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनी कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागू शकतात. अशा परिस्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांसाठी 2025 खूप भाग्यवान ठरू शकते. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या राशी बदलामुळे विशेष फायदा होणार आहे. यावेळी वृषभ राशीच्या लोकांवर देवगुरु गुरूची कृपा वर्षाव होणार आहे. तुमच्या करिअर आणि व्यवसायात मोठे फायदे होण्याची शक्यता आहे. तुमचे प्रलंबित पैसे परत मिळू शकतात. मान-सन्मान वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकतं. जोडीदाराकडून प्रेम मिळू शकतं.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा राहणार आहे. यामुळे तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. कोर्ट केसेसमध्ये विजय मिळू शकणार आहे. मानसिक तणाव दूर होऊ शकणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात वाढ होऊ शकणार आहे. पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकणार आहे.

मकर रास

मकर राशीलाही शनिदेवाच्या राशी बदलात विशेष लाभ मिळू शकणार आहे. मकर राशीच्या लोकांनाही आराम मिळेल. नवीन वर्षात जीवनात सकारात्मक बदल होणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढू शकणार आहे. प्रलंबित पैसे परत मिळू शकणार आहेत. काही नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ असेल. गुंतवणुकीत मोठा फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT