Shash Mahapurush Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikon Rajyog: शनी देव बनवणार पॉवरफुल केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Kendra Trikona Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीनुसार आणि त्यांच्या संयोगातून अनेक 'योग' तयार होतात, ज्यापैकी 'राजयोग' हे अत्यंत शुभ मानले जातात. राजयोग म्हणजे ग्रहांची अशी विशिष्ट मांडणी, जी व्यक्तीला धन, संपत्ती, मान-सन्मान, पद आणि यश मिळवून देतं.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनि हा कर्माचा कर्ता, न्यायाचा देव मानला जातो. तो लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनीदेव दर अडीच वर्षांनी आपल्या राशी बदल करतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. मार्च २०२५ मध्ये शनीने आपली मूळ त्रिकोण राशी कुंभ सोडून गुरुच्या मीन राशीत प्रवेश केला आहे. यावेळी तो जून २०२७ पर्यंत तिथेच राहणार आहे.

शनि मीन राशीत राहिल्याने तो केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करणार आहे आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. शनि त्रिकोणाचा स्वामी असल्याने आणि मिथुन राशीत भाग्यभाव असल्याने केंद्र भावात भ्रमण करत आहे. त्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी, शनीचा केंद्र त्रिकोण योग अनेक क्षेत्रांमध्ये फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवण्यात देखील यशस्वी होऊ शकता. या राशीच्या लोकांचे जीवन सुधारणार आहे. केंद्र त्रिकोण राजयोग शिक्षणाच्या बाबतीतही फायदेशीर ठरू शकतो.

मकर रास

या राशीच्या तिसऱ्या घरात शनि महाराज विराजमान आहेत. या राशीच्या लोकांना शनि साडेसातीच्या संकटातूनही मुक्तता मिळाली आहे. तुम्ही परदेशात व्यवसाय नोकरी इत्यादी माध्यमातून चांगला नफा मिळवू शकता. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. तुम्हाला निरुपयोगी खर्चातून आराम मिळू शकणार आहे.

तूळ रास

या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनि महाराज सहाव्या घरात विराजमान आहेत. केंद्र त्रिकोण योग या राशीच्या लोकांसाठी एक मजबूत योगकारक ठरू शकणार आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांनाही खूप फायदे मिळू शकतात.अचानक आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना शनिचा फायदा होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT