Shani Gochar And Surya Grahan saam tv
राशिभविष्य

Shani Gochar 2025: सूर्यग्रहणासोबत मीन राशीत शनीचं गोचर; 'या' 3 राशींना मिळणार पद-प्रतिष्ठा, रिकामी तिजोरी पैशांनी भरणार

Shani Gochar And Surya Grahan 2025: शनीच्या गोचर आणि सूर्यग्रहणाचा प्रभाव काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे, तर काही राशींसाठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनी यांचे संबंध पिता-पुत्रासारखे मानले जातात. त्यामुळे या दोन ग्रहांच्या विशेष संयोगाचा प्रभाव राशींवर मोठ्या प्रमाणात पडतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक कॅलेंडरनुसार, नऊ ग्रह विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. नऊ ग्रहांपैकी सर्वात महत्त्वाचा ग्रह शनी आहे. शनी सुमारे अडीच वर्षांनंतर आपल्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी शनी त्याच्या मूळ त्रिकोण चिन्ह कुंभ राशीत असून २९ मार्च रोजी ते या राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. एकीकडे शनि मीन राशीत जाणार आहे, तर दुसरीकडे, त्याच दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण मीन राशीत होणार आहे.

शनीच्या गोचर आणि सूर्यग्रहणामुळे काही राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. तर काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. मुळात शनि आणि सूर्य यांना पिता आणि पुत्र मानण्यात येतं. दरम्यान शनी गोचर आणि सूर्य ग्रहणामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी शनीचं मीन राशीत भ्रमण फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये वाढ होण्यासोबतच भरपूर आर्थिक फायदाही मिळू शकणार आहे. वरिष्ठांशी चांगले संबंध राहणार आहेत. तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. या काळात लांबचा प्रवास फायदेशीर ठरू शकतो.

कर्क रास

या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. तुमच्या जीवनावरील नकारात्मक प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत सुरू असलेल्या समस्याही संपुष्टात येणार आहेत. आणि आनंद तुमच्या दारावर ठोठावू शकणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचेही जीवन चांगले राहणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि तुम्ही पैसे वाचवू शकाल.

कुंभ रास

या राशीच्या पहिल्या आणि बाराव्या घराचा स्वामी असल्याने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर शनी या राशीच्या दुसऱ्या घरात राहतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहेत. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

SCROLL FOR NEXT