Shukra Ast: 4 दिवसांसाठी अस्त अवस्थेत शुक्र ग्रह; 'या' 3 राशींच्या अडचणी वाढणार, दुःखाचा करावा लागणार सामना

Venus combustion effects : शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे सर्व राशींवर काही ना काही परिणाम होतो. मात्र, यावेळी काही राशींवर त्याचा मोठा नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या काळात 3 राशींच्या जातकांना विशेष अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.
Shukra Ast
Shukra Astsaam tv
Published On

१९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता धन आणि वैभवाचा स्वामी शुक्र अस्त झाला आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, शुक्र केवळ 4 दिवसांसाठी अस्त झाला असून रविवारी 23 मार्च 2025 रोजी त्याचा पुन्हा उदय होणार आहे. शुक्र हा अत्यंत शुभ ग्रह असून प्रेम, आकर्षण, धन, ऐश्वर्य, वैभव यांचा कारक आहे.

शुक्राच्या अस्त स्थितीचा प्रत्येक राशींच्या जीवनावर परिणाम होतो. मात्र यावेळी काही राशींवर याचा अतिशय नकारात्मक परिणाम होतो. यावेळी 3 राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढू शकतात. या राशीच्या जातकांच्या करिअर, नोकरी, व्यवसाय आणि लव्ह लाईफवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींवर याचा प्रभाव पडणार आहे ते पाहूयात.

Shukra Ast
Surya Gochar: फेब्रुवारीमध्ये तब्बल ३ वेळा सूर्य बदलणार चाल; 'या' राशींच्या इच्छा होणार पूर्ण, पैसा बरसणार

मीन रास

मीन राशीत शुक्र ग्रह अस्त होत असल्याने करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात काही आव्हानं निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सावध गिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचा जोखमीचा निर्णय घेणं टाळा. प्रेम आणि वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती देखील उद्भवू शकणार आहे.

कर्क रास

शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पैशांचे व्यवहार करताना सावध राहावं लागणार आहे. छोटीशी चूकही तुमचं मोठं आर्थिक नुकसान करू शकणार आहे. प्रेम संबंधांमध्ये संयम आणि समजूतदारपणा ठेवा.

Shukra Ast
Shani Gochar 2025: ३० वर्षांनी शनी करणार गुरुच्या राशीत प्रवेश; शनी देवाच्या कृपेने 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

वृश्चिक रास

या काळात तुमचा खर्च वाढणार आहे. याचा तुमच्या बजेटवर मोठा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नुकसान झाल्याने तुमची चिंता वाढू शकणार आहे. यामुळे तुमचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतात. पालकांशी काही मतभेद असतील ते अजून बिघडण्याची शक्यता आहे.

Shukra Ast
Shani Gochar: 9 दिवसांनी शनी चाल बदलणार; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु, तिजोरी पैशांनी तुडुंब भरणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com