Shani Drishti Effects saam tv
राशिभविष्य

Shani Drishti Effects: शनीची 'या' राशींवर अशुभ दृष्टी; घरात समस्या, वादासह पैशांचीही होणार हानी

Shani Drishti Effects: प्रत्येक राशीच्या लोकांच्या आयुष्यात कधी ना कधी शनीची दृष्टी नक्कीच पडते. शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत असून यामुळे काही राशींना शनि सती आणि धैय्यापासून मुक्ती मिळते.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह म्हणजे शनी. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. शनीच्या प्रत्येक हालचाल बदलाचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. प्रत्येक राशीच्या लोकांच्या आयुष्यात कधी ना कधी शनीची दृष्टी नक्कीच पडते. शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत असून यामुळे काही राशींना शनि सती आणि धैय्यापासून मुक्ती मिळते. मात्र यावेळी काही राशींच्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींमध्ये शनीची पहिली आणि दुसरी अवस्था सुरू आहे, तर अनेक राशी आहेत ज्यामध्ये शनीची तिरकस दृष्टी आहे. काही राशींवर शनीची तिसरी नजर असल्यामुळे या राशींच्या आयुष्यात संकटांचा काळ सुरु होणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे.

मेष रास

शनीच्या या दृष्टीमुळे या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. यामुळे छुपे शत्रू समोर येऊ शकतात. या काळात तुमच्या पैशांची हानी होणार आहे. महत्त्वाच्या कामात तुम्हाला अपयश मिळणार आहे. तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

कन्या रास

या राशीच्या लोकांना शनीची तिसरी नजर असणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळू शकतात. तुमच्या कामासाठी इतर कोणाचं तरी कौतुक होणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांवरही शनीच्या तिसऱ्या दृष्टीच्या प्रभाव पडणार आहे. या राशीच्या लोकांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकणार आहे. करिअर क्षेत्रातही अनेक अडचणी येऊ शकतात. दुसऱ्याच्या वादात पडू नका. गुंतवणूकीत तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

SCROLL FOR NEXT