Saturday Horoscope 
राशिभविष्य

Saturday Horoscope : शनिवारी धनलक्ष्मीचा योग, या ५ राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Aries, Cancer, Libra, Capricorn, Aquarius, Horoscope News : शनिवारी तयार होणाऱ्या धनलक्ष्मी योगामुळे मेष, कर्क, तुला, मकर आणि कुंभ राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे. जाणून घ्या तुमच्या राशीचे आजचे भविष्य.

Namdeo Kumbhar

Saturday Horoscope in marathi : शनिवारी धन लक्ष्मी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. तुला, कुंभ, मेष, कर्क आणि मकर राशींसाठी शनिवारचा दिवस विशेष लाभदायक असेल. पाच राशीच्या लोकांकडे शनिवारी पैसा येऊ शकतो. शनिवारी वैशाख शुक्ल द्वादशी तिथी, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आणि धन लक्ष्मी योग तयार होतोय. शनिदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींना आर्थिक लाभ, यश आणि समृद्धी प्राप्त होईल. तसेच करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक सौहार्द मिळेल.

चंद्रमा आणि शुक्र यांच्या संयोगाने धन लक्ष्मी योग तयार होत आहे. आर्थिक लाभ आणि समृद्धी देणारा आहे. शनिवार हा शनिदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित असल्याने या राशींवर विशेष कृपा राहणार आहे. पण आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी आणि शनिदेव व माता लक्ष्मीची पूजा करावी. नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. कोणत्या राशीसाठी शनिवार कसा आहे पाहूयात?

मेष (Aries):

मेष राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील, जुन्या योजनांना गती मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळेल. शनिदेवाच्या कृपेने अनेक अडथळे दूर होतील.

कर्क (Cancer):

आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईलच. त्याशिवाय नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौहार्द वाढेल, जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने समृद्धी वाढेल.

तुला (Libra):

तुला राशींच्या लोकांना व्यापारात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प किंवा करार यशस्वी होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, लोकांमध्ये मान-सन्मान मिळेल. धन लक्ष्मी योगामुळे शनिवारी आर्थिक स्थिरता येईल.

मकर (Capricorn):

नोकरी-व्यवसायात प्रगती होईल, नवीन संधींचा लाभ मिळेल. आर्थिक नियोजनाला यश मिळेल, लोकांसोबतचा संवाद अधिक चांगला होईल. शनिदेवाच्या कृपेने दीर्घकालीन योजनांना गती मिळेल. वैयक्तिक जीवनात आनंद आणि स्थिरता येईल.

कुंभ (Aquarius):

आर्थिक लाभ आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. व्यवसायात विस्तारेल, भागीदारीतून मोठा फायदा मिळण्यास सुरूवात होईल. कुंभ राशीच्या लोकांना सामाजिक कार्यात यश मिळेल, त्यामुळे इतरांमध्ये प्रभाव वाढलेला असेल. शनिदेवाच्या आशीर्वादाने सर्व अडचणी दूर होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

SCROLL FOR NEXT