शनिवार,२८ जून २०२५,आषाढ शुक्लपक्ष,
विनायकी चतुर्थी.
तिथी- तृतीया ०९|५४
रास- कर्क
नक्षत्र- पुष्य
योग-हर्षण
करण-गरज
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - जोडीदाराच्या करिअर विषयी चांगल्या वार्ता कानावर येतील. काहीतरी नव्याने घटना घडणार आहे असा दिवस आहे. धावपळ असले तरी सुद्धा सौख्याच्या दृष्टीने दिवस उत्तम राहील.
वृषभ - तुम्हाला असणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी विषयी आज वैद्य चांगले मिळतील. मनामध्ये अपेक्षांचे नव्याने तोरण बांधले जाईल. जवळच्या लोकांच्या कडून वेळीच मदत मिळाल्यामुळे मनाची उभारी वाढेल.
मिथुन- घरापासून घरातील लोकांच्या पासून विशेष लाभ मिळण्याचाच दिवस आहे. ठरवूनही होणार नाहीत अशा गोष्टी आज न ठरवता होतील. धन योगाला दिवस उत्तम आहे .
कर्क - काय करावे काय करू नये अशा संभ्रमामध्ये रहाल. काही वेळेला अडचणी येण्यापेक्षा सुकर गोष्टी खूप आल्यामुळे अनेक संधी आज सहज निर्माण होतील. असा दिवस आहे. पाऊल टाकल तिथे यश मिळेल.
सिंह - वेगळा काहीतरी पराक्रम घेऊन आलेला आजचा दिवस आहे. अडचणी आल्या तरी पोलादासारखे उभे राहाल. मोठी स्वप्ने मोठ्या आकांक्षा याला एक वेगळा आकार आज येईल.
कन्या - वडिलोपार्जित संपत्ती प्रॉपर्टी याविषयी घटना घडताना आज भाग्यकारक काहीतरी गोष्टी आपल्या कानावर येतील. जवळच्या व्यक्तीकडून उत्तम सहकार्य मिळेल. करिअरच्या ठिकाणी चांगली ग्रोथ आहे.
तूळ- नातवंड सुखामध्ये वेगळं असं काहीसं वाटेल. जेष्ठांना एक मायेचे आभाळ मिळेल. सुकर असणाऱ्या गोष्टी अजून सहज झाल्यामुळे भगवंतावरचा विश्वास दृढ होईल. आज विनायक चतुर्थी गणेश उपासना करावी.
वृश्चिक- माते कडून नव्याने काही गोष्टी आपल्याला मिळतील. ज्याच्यामुळे आपल्या कर्तुत्वाला वेगळी झालर मिळेल. काही वेळेला अनेक हात मदतीचे घेऊन जाण्यापेक्षा आपला हात जगन्नाथ होऊन एकट्याने काम केलेले बरे पडते हे आज जाणवेल.
धनु - व्यवसाय व्यापार नोकरी यामध्ये जो काही आपण निर्णय घेतला असाल त्यामध्ये "आकाश ठेंगणे"अशी परिस्थिती येईल. यश मिळताना दिसते आहे. नाहक कटकटी टाळून पुढे चला
मकर - कामाच्या ठिकाणी प्रगती आणि गती दोन्हीही आहेत. नको त्या विचारांना सहज लांब ठेवणे आज शक्य झाले तर ते करावे. जुन्या गोष्टींचा ससेमिरा आज करू नका.
कुंभ - एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये आज व्यस्त रहाल. अनेक गोष्टी कराव्यात इतका जीवनाचा उत्साह आज जाणवेल. संशोधनात्मक कार्यात विशेष गती मिळेल.
मीन - मातृत्वाला वेगळी झळाळी मिळेल . मुलांविषयीचे प्रेम वाढीला लागेल. खऱ्या अर्थाने घराविषयी चा आकर्षण आणि ओढ आज जाणवेल. झालेल्या गोष्टी विशेष आणि खंत न ठेवता पुढे गेलात तर दिवस चांगला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.