Dhanshri Shintre
हिंदू परंपरेनुसार सूर्यदेव हे ग्रहांचे अधिपती मानले जातात आणि त्यांना दररोज पाणी अर्पण करणे अत्यंत पुण्यकारक व शुभ मानले जाते.
रविवारी सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? चला, त्याच्या शुभ परिणामांविषयी जाणून घेऊया.
सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने श्रद्धेनुसार सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनातील नकारात्मकता कमी होते.
ज्योतिषानुसार, रविवारी सूर्याला जल अर्पण केल्याने ग्रहदोष कमी होतात आणि नकारात्मक परिणाम टाळले जातात.
रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पाप नष्ट होतात, ग्रहदोष कमी होतात आणि जीवनातील त्रास दूर होतो.
ज्योतिषानुसार, रविवारी सूर्याला जल अर्पण केल्याने समृद्धी, आनंद, सौभाग्य आणि जीवनात सुखशांती प्राप्त होते.