horoscope Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Saturday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडण्याची शक्यता आहे. तर काहींचे आयुष्य आनंदाने फुलून जाण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

पंचांग

शनिवार,२७ डिसेंबर २०२५,पौष शुक्लपक्ष.

तिथी-सप्तमी १३|१०

रास-मीन

नक्षत्र-पूर्वभाद्रपदा

योग-व्यतीपात

करण-वणिज

दिनविशेष-व्यतीपात वर्ज्य

मेष - चरतत्वाची असणारी आपली रास. प्रवासही खूप आवडतात. काहीतरी लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्रवासाचे योग आहेत. दुसऱ्याच्या तब्येतीसाठी हॉस्पिटल मध्ये खर्च होईल.दिवस बरा आहे.

वृषभ - मनातील इच्छा पूर्णत्वाला जाण्याचा आजचा दिवस आहे. "जो जे वांछील तोते लाहो" अशा घटना घडतील. दिवस आनंदी आणि आपल्या लोकांबरोबर सकारात्मकतेने जाणार आहे. गुंतवणूक फायद्याची ठरेल.

मिथुन - व्यवसाय करायचा आहे तर काहीतरी आव्हाने झेलावी लागतात. आज काही मोठ्या गोष्टी आणि घडामोडी व्यवसायात घडतील. आपल्या वरिष्ठ व्यक्तीकडून योग्य ती मदत वेळेवर मिळेल आणि दिवस सुकर जाईल.

कर्क - भावनेला अधिक महत्त्व देणारी आपली रास आहे. पण अर्थात आजपर्यंत आपण वळून बघितले तर यामुळे काही आपले वाईट झाले नाही. देवाने दिलेल्या गोष्टींचे खूप छान पडसाद तुम्हाला दिलेले आहेत. आज अशाच गोष्टी घडणार आहेत की जेणेकरून मन फुलून जाईल. शिव उपासना करा.

सिंह - अहंकार आणि स्वाभिमान यामध्ये एक हलकी रेघ आहे. काही गोष्टी चुकीच्या व्यक्तीकडून करण्यासाठी आज वेळ दवडू नका. त्यापेक्षा उशिरा का होईना एकट्याने कामे केलेली बरी हे समजून जा. मोठे लाभ, अचानक पैसा मिळणार आहे.

कन्या - अधिक चौकस आणि बौद्धिकता चांगली असणारी आपली रास आहे. व्यवसायामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टींचे निर्णय घ्याल ते योग्य ठरणार आहेत. हिशोबाला चोख असे भागीदाराबरोबर व्यवहार ठेवा.

तूळ - आपल्या चांगल्या क्षणावर अनेकांचा डोळा आहेच. काही गुप्त शत्रू या बाबतीत त्रास देतील असे वाटते आहे. आपले कोण, परके कोण ओळखून पुढे जा. तर दिवस सुकर राहील. नोकरीच्या ठिकाणी अलबेल आहे .

वृश्चिक - अबोल्यात प्रेम असते असे काहीसे आपल्याला वाटते. पण काही दिवस हे व्यक्त करण्यासाठी असतात. आज आपल्या प्रियकराला बोलून आनंदि ठेवा .काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सुद्धा खांद्यावर येतील. या संदर्भात चाल ढकल करू नका. कुलदेवतेची उपासना करा.

धनु - एखादी गोष्ट करताना संधी तर आपल्याला नेहमीच निर्माण होते. दुसऱ्या व्यक्तीने हिरवा कंदील दाखवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आज घरातील कोणीतरी मोठी व्यक्ती आपल्या पाठीशी राहणार आहे.जागेचे व्यवहार पार पडतील. दिवस चांगला आहे .

मकर - स्वतःवरच्या अस्तित्वावर आपल्या कामगिरीवर अजिबात शंका घेऊ नका. "लेट पण थेट" अशी असणारी आपली रास. कासवाच्या गतीने जरी गेला तरी बाजी मारणार असा आजचा दिवस आहे. भावंडांकडून योग्य ते सहकार्य मिळेल.

कुंभ - संपत्ती आयुष्यात महत्त्वाचीच असते हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. तशी योग्य ठिकाणी योग्य पैसा खर्च करणारी आपली रास आहे. आज काही नव्याने गोष्टी आयुष्यात घडतील. चर्चा विचारविनिमय करून वारसा हक्काचे संपत्ती बाबत निर्णय घ्याल.

मीन - "मन चंगा तो कठौती में गंगा "असा काहीसा दिवस आहे. मन प्रफुल्लीत राहील. आनंद द्विगुणीत होईल. आपले स्वतः ची साथ आज जास्तच प्रिय वाटेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या इतरांवर प्रभाव असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांनी माझंही लैंगिक शोषण केलं, महिला कुस्तीपटूचा खळबळजनक दावा

हृदयद्रावक! दशक्रियाविधी वेळी मुंडन करताना गंगा नदीत ६ जण बुडाले, ४ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Weight Loss: सुटलेलं पोट कमी कारायचं आहे? मग घरीचं करा 5 सोपे व्यायाम मिळेल परफेक्ट फिगर

Konkan Tourism : कोकणातील स्वर्ग! धबधबे अन् समुद्रकिनाऱ्यांची सफर; पाहा 'कणकवली'तील ५ पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT