Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Horoscope: आजचा दिवस आनंद, सुख समृद्धीचा; ६ राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Saturday Horoscope In Marathi: बारा राशींपैकी ६ राशींच्या जीवनात आनंद, सुख समृद्धी येणार आहे. अनेकांसाठी आजचा दिवस धनलाभाचा असणार आहे. तुमच्या नशीबात आज काय लिहिलंय हे जाणून घ्या.

Anjali Potdar

शनिवार,११ ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष.

तिथी-पंचमी १६|४४

नक्षत्र-रोहिणी

रास-वृषभ २३|२५ नं. मिथुन

योग-व्यतिपात

करण-तैतिल

दिनविशेष-१४ नं. चांगला

मेष

कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तिखट, मसालेदार खाण्याची आपली आवड आज जास्त तीव्र होईल. धनाशी निगडित असणारे व्यवहार पार पडतील. वाणीवर कंट्रोल ठेवावे, नियंत्रण ठेवावे.

वृषभ

आरोग्य चांगले राहील. मानसिकताही उत्तम आहे. या दोन्ही गोष्टी चांगल्या राहिल्यामुळे दिवस आनंदाचा दिसतो आहे. ताणतणाविरहित जीवन जगण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. खरेदीमध्ये गुंग व्हाल.

मिथुन

खर्च करण्यासाठी आज आपला हात सढळ असेल. कदाचित दिवसाच्या शेवटी त्याबद्दल थोडे वाईटही वाटेल. काही कारणासाठी मानसिक अस्वस्थता जाणवेल. अध्यात्मिक बैठक तुम्हाला स्वस्थता देऊ शकेल.

कर्क

प्रेमाने सगळ्यांना आपलेसे करणारी तुमची रास आहे. मैत्रीचे बंध दृढ होतील. नव्या काही ओळखी आणि गाठीभेटी होऊन त्यामधून चांगले संबंध प्रस्थापित होतील. दिवस चांगला आहे.

सिंह

ताठ मानेने जगायला आपल्याला आवडते. व्यवहाराला आपण कायम दक्ष असता. त्यामुळे समाजामध्ये वेगळी पत आणि प्रतिष्ठा आपली आहे. आज याला दूजोरा मिळेल. कामाच्या क्षेत्रात प्रगती आहे.

कन्या

बौद्धिक असणारी आपली रास नवनवीन गोष्टींच्या उत्खननामध्ये आज प्रवास होतील. भगवंताची साथ चांगले मिळाल्यामुळे केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळेल. सुवर्ता कानी येतील.

तूळ

अपार कष्ट असा काहीसा दिवस आहे." कशासाठी पोटासाठी" अशी आपली रास नसून "कशासाठी पैशासाठी" अशी काही आपली मानसिकता आहे. अर्थात केलेल्या कष्टाचे दिवसाचे शेवटी सार्थक झाले असं वाटेल.

वृश्चिक

व्यवसायामध्ये नवनवीन गोष्टी अमलामध्ये आणाल. येणारे अडथळे चुटकीसरशे बाजूला साराल. वेळ आली तर कायदा आणि कटकटी यांच्याशी चार हात करायला आज तुम्ही समर्थ आहात हे लक्षात ठेवा.

धनु

सुरू होणाऱ्या गोष्टीला शेवट असतो हे समजून जावे लागेल. धावपळ दगदग केली असेल तरीसुद्धा शत्रूंच्या त्रासामुळे काही वेळेला ती गोष्ट सोडून द्यावी, अशी भावना होईल. "धीर धरे धीरापोटी फळे रसाळ गो मटी" ही पंक्ती आज लक्षात ठेवा.

मकर

अनाकलनीय घटना घडण्याचा आजचा दिवस आहे. अकल्पित काहीतरी चांगले आपल्या वाट्याला येईल. शिव उपासना यासाठी आपल्याला फलदायी ठरेल. विद्यार्थ्यांना यशदायी असणारा आजचा आपला दिवस आहे.

कुंभ

वाहन सौख्य उत्तम राहील. नवीन खरेदी काही करणार असाल तर आज सर्व सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आह. प्रेम केले असेल तर प्रेमवीरांना आपल्या प्रियकरासाठी खर्च होण्याचा आजचा दिवस आहे.

मीन

व्यवसायामध्ये वृद्धीच्या संधी येतील. आपला मनोदय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धडपड आणि धावपळ आज आपल्याकडून होईल. जाहिरात क्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT