Horoscope Today  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : सोमवार ठरणार आर्थिक अडचणीचा, तर काहींना पाठीवर मिळेल शाबासकीची थाप; वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today In Marathi : सोमवार काही जणांसाठी आर्थिक अडचणीचा ठरणार आहे. तर काहींना पाठीवर शाबासकीची थाप मिळेल. वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,१७ मार्च २०२५ फाल्गुन कृष्णपक्ष,

संकष्टी चतुर्थी.

तिथी- तृतीया १९|३४

रास- तुला

नक्षत्र- चित्रा

योग- ध्रुव

करण-विष्टीकरण

दिनविशेष-२० नं. चांगला

मेष - कोर्टाचे निकाल मनाप्रमाणे लागतील. काही वेळेला गोष्टी ठरवून तश्याच पार पडतात असा आजचा दिवस नाही. पण इतरांचे सल्ले विचारात घ्यायला हरकत नाही. जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागाल.

वृषभ - आजोळी प्रेम संबंध वृद्धिंगत होतील. मात्र चोर चोरी आणि आपल्या महत्त्वाच्या जिन्नस आणि ऐवजांची आज काळजी घ्यावी.

मिथुन - लॉटरीमध्ये नशीब आजमावायला आज हरकत नाही. विष्णू उपासना विशेष फलदायी ठरेल. संततीकडून सुवार्ता आल्यामुळे दिवस चांगला जाईल.

कर्क - आज कुणीतरी यावे असा आजचा दिवस आहे. मनामध्ये वाटणाऱ्या घटना तशाच घडतील. जवळच्या व्यक्तीचे घरी आगमन झाल्यामुळे मन प्रफुल्लित राहील.

सिंह - पाठीवर भावंडांची शाब्बासकीची थाप मिळेल आणि कामाला नवीन उत्साह आणि जोम येईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडण्याचा आजचा दिवस आहे.

कन्या- गुंतवणुकीसाठी दिवस संधी घेऊन आलेला आहे. घरामध्ये छोटेसे धार्मिक कार्य होईल. आनंदी आणि खेळीमेळीचे वातावरण कुटुंबात असेल.

तूळ- नव्याने खरेदी करण्यासाठी दिवस चांगला आहे. मग वस्त्र असो अलंकार असो घरातील वस्तू असो. स्वतःला सजवण्यासाठी दिवसभर व्यस्त रहाल. एक उनाड दिवस असा आजचा दिवस राहिल.

वृश्चिक - "मन चिंती ते वैरी ना चिंती" असा आजचा दिवस आहे. केलेले सर्व फळ मिळेल पण उशिरा. काही वेळ नशिबात असते जी आज मनोव्यथा कोणाला न सांगता सोसणे हे जास्त गरजेचे आहे. पैशाला वाटा फुटतील.

धनु - मैत्रीसाठी काही धाडसाचे, धडाडीचे निर्णय घ्याल. जवळचा लहानपणीचा मित्र भेटण्याची दाट शक्यता आहे. स्नेहभोजनाचे योग येतील.

मकर - समाजकारण आपल्याला आवडतेच. इतरांनी उचलून धरल्यामुळे नवीन उत्साह आणि उभार आज येईल. कार्यक्षेत्री धावपळ राहील. दिवस चांगला आहे.

कुंभ - शिव, विष्णू उपासना आज फलदायी ठरेल. नव्या काही गोष्टी आयुष्यात येतील आणि त्याचा सहज मार्गही सुकर होईल. देवाने दिलेल्या गोष्टींविषयी विशेष आभार वाटेल. दिवस चांगला आहे.

मीन - जोडीदाराकडून आज पैशाचे योग आहेत. इच्छा कराल ते मिळेल पण त्यासाठी नैतिकता सोडून राहू नका. कुठेही न समजता पत्रव्यवहार करण्याच्या भानगडीत पडू नका. दिवस संमिश्र जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT