Horoscope Today  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : जवळच्या व्यक्तीच्या भेटीसाठी आतुर असाल; ४ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट, वाचा राशीभविष्य

Horoscope Today in marathi : काही राशीचे लोक जवळच्या व्यक्तीच्या भेटीसाठी आतुर असतील. तर ४ राशीच्या लोकांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येणार आहे. तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा

Anjali Potdar

आजचे पंचांग

शनिवार,२९ मार्च २०२५ फाल्गुन कृष्णपक्ष,

दर्श अमावस्या.

तिथी- अमावस्या१६|२८

रास-मीन

नक्षत्र-उत्तरा भाद्रपदा

योग-ब्रह्मा

करण- नागकरण

दिनविशेष-अमावस्या वर्ज्य

मेष - सरत्या मराठी वर्षाचा शेवटच्या दिवस आज आहे. मनामध्ये हल्लकल्लोळ माजेल. "कोण गा मी कुठला जन्मास आलो" अशा काही गोष्टी मनामध्ये येतील. नाहक विचारांनी मन आणि बुद्धी ग्रासली जाईल. सकारात्मक रहा.

वृषभ - वर्षाचा शेवट जरी आला असेल तरी, मनाची अवस्था "दिन हैं सुहाना आज पहिली तारीख हैं "अशीच असेल. मना सारख्या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे आनंदी आनंद वाटेल. अनेक प्रकारचे लाभ होतील.

मिथुन - "केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर" अशी अवस्था राहील. धावपळ आणि दगदगीमध्ये दिवस जाईल. पण मनामध्ये सुंदर भावना येतील. सन्मान, कीर्ती आणि प्रतिष्ठेने भारावलेला दिवस असेल.

कर्क - "आज मदहोंश हुआ जायें रें मेंरा मन" अशी मनाची अवस्था प्राप्त होईल. भगवंताच्या, जवळच्या व्यक्तीच्या भेटीसाठी मन आतुर होईल. भाग्यकारक घटना घडण्याचा कालावधी आहे.

सिंह - "कशासाठी कासावीशी कशासाठी आटापिटा" अशा काहीसे प्रश्न निर्माण होतील. जोडलेल्या गोष्टी तोडायच्या नाहीत या नावाखाली नात्यांचे दडपण राहील. एकटेपणाची भावना निर्माण होईल.

कन्या - "मन माझे मोरपिसी पंख जणू" अशा संमिश्र भावना जोडीदाराविषयी वाटतील. भरपूर प्रेम आणि काम मिळाल्याने चांगले वाटेल. नाहक असणारे वाद, कोर्टाच्या कटकटी अशा गोष्टींनी भरलेला दिवस आहे. बुद्धीने मात करावी लागेल.

तूळ - "मी जाता राहील कार्य काय? जन पळभर म्हणतील" अशा थोड्या नकारात्मक भावना येतील. कोणाशीही आज वैर घेऊन वागू नका. शत्रु वाढतील आपलेच लोक घात करणारे ठरतील. नोकरीत मात्र प्रगती आहे.

वृश्चिक - "स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला" अशा सुंदर प्रेम भावनेने भारलेला दिवस असेल. आशेला नवे पंख फुटतील. पैशाची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

धनु - "अजीब दासतां हैं यें कहां शुरु कहां खतम्" असा काहीसा दिवस आहे. सर्व सुखे मिळणारा दिवस आहे. कसे होतो आणि कसे झालो या विचारांमध्ये रहाल. पण सर्व सुखे उपभोगाल जसे की गृह सौख्य, वाहन सौख्य, कुटुंब सौख्य इत्यादी.

मकर - "वेडात मराठे वीर दौडले सात" असा पराक्रम आपल्याकडून होईल. कोणत्याही गोष्टीवर आज शंका घ्यायला नको. जे कराल त्यात यश नक्कीच मिळणार आहे. प्रवास घडतील.

कुंभ - "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं" पैशाची आवक भरपूर आणि कुटुंबसुख,आनंदीआनंद, नात्यांची ऊठबस आणि खाण्याची चंगळ असा आजचा दिवस आहे.

मीन - "मला सांगा सुख म्हणजे आणखी काय असतं" असे स्वतःच्या आनंदामध्येच राहणार आहात. सात्विकता कामी येईल.इतरांकडून काही न मागता स्वतःला आनंदी ठेवण्याचा आजचा दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT