Rashi Bhavishya Today 30 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : संधीचे सोने कराल, गुंतवणूक ठरणार फायदेशीर; वाचा तुमचं आजचं राशी भविष्य

Horoscope Today 30 June 2024 : आज काही लोकांना चांगल्या संधी चालून येतील. ज्याचे सोने कराल. गुंतवणूक करणार असेल, तर फायदेशीर ठरेल, वाचा आजचे राशी भविष्य...

Anjali Potdar

आजचे पंचांग - दिनांक ३० जून २०२४

तिथी- ज्येष्ठ कृष्ण नवमी. नक्षत्र- रेवती .योग - अतिगंड. करण - गरज. रास - मीन ०७.३४ नंतर मेष. दिनविशेष- चांगला दिवस.

मेष : सकारात्मकता वाढेल

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील सकारात्मकता वाढेल. जे आहे त्याच्यात आनंद मिळेल. "रुबाब माझा बघा" असा दिवस आहे.

वृषभ : मनस्वस्थ खराब होईल

"अकेला चला हू मैं"आजचा दिवस आहे. एकूणच एकट्यानेच सगळ्या गाडा ओढायचा आहे. मनस्वस्थ खराब होईल. दूरचे प्रवास, प्रदेशातले प्रवासाची आखणी करत असाल तर त्याच्यासाठी दिवस चांगला.

मिथुन : भेटीगाठीतून लाभ होतील

ज्येष्ठांच्या भेटीगाठी आणि त्यातून अनेक लाभ होतील. स्नेहभोजनाचा आनंद लुटाल .आयुष्य किती छान आहे याची आज जाणीव होईल.

कर्क : सर्व कामे पूर्ण होतील

"काम एके काम" असा दिवस आहे. पायाला भिंगरी लागण्यासारखे प्रवास होतील. अनेक गोष्टी ज्या पूर्वी ठरवल्यात ते आज मार्गे लागतील. बैठका यशस्वी होतील.

सिंह : उत्तम संधी मिळतील

आपल्या राशीचे स्वभावाप्रमाणे दान व उदारता वाढेल. अनेक उत्तम संधी मिळतील. तीर्थक्षेत्री जाण्याचे योग येतील किंवा त्याची आखणी कराल.

कन्या : आज जरा सावध राहावे

स्वभावाप्रमाणेच आज काही त्रास कटकटी होतील. अति विचार खोलात घेऊन जाणार आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वास्थ्य जपा.

तुळ : उत्तम सहकार्य मिळेल

कोर्टाच्या कामांमध्ये आज लगबग राहील. आपल्या बाजूने निकालाची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी भागीदाराचे उत्तम सहकार्या लाभेल.

वृश्चिक : स्वभावाला मुरड घाला

मंगळाची असणारी आपली रास आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतो. पण काहीजण तुम्हाला त्रास देतील. आज आपल्या स्वभावाला थोडी मुरड घाला. शत्रू वाढणार नाही त्याची काळजी घ्या.

धनु : सन्मान मिळण्याचा दिवस

संततीस सुवार्ता देईल. पारितोषिक, सन्मान मिळण्याचा आजचा दिवस आहे. तुमचे कर्तुत्व बहरणार आहे. दिवस आनंदाची झालर घेऊन आला आहे.

मकर : आनंदाच्या गोष्टी घडतील

पशु व्यवहार मार्गी लागतील. विशेष आनंदाच्या गोष्टी आयुष्यात येणार आहेत. कुटुंबीयांबरोबर पुढील गोष्टींसाठी सल्लामसलत कराल .

कुंभ : संधीचे सोने कराल

जे असेल त्यात ताकतीने पुढे जाल. एकूणच येणाऱ्या संधीचे सोने कराल. कोणाच्याही सहकार्यविना यश गाठण्याचा आजचा दिवस आहे. सहजगत्या भावंड मदत करतील.

मीन : गुंतवणूक फायदेशीर ठरेल

"येरे येरे पैसा" असा आजचा दिवस आहे. अचानक सर्व मार्गाची गुंतवणूक आज फलदायी ठरणार आहे. पैशाची आवक चांगली असल्यामुळे दिवस सुखाचा राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

Liver Infection: लिव्हर इन्फेक्शन झाल्यास शरीरात 'ही' लक्षणे दिसतात, वेळीच घ्या काळजी नाहीतर...

Thane Traffic : घोडबंदर रोड ४ दिवसांसाठी बंद राहणार, कधी आणि केव्हा? पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT