Mangal And Guru Yuti 
राशिभविष्य

Mangal Shukra Yuti 2025: 18 वर्षांनी शुक्र-मंगळ दुर्मिळ संयोग; दिवाळीपूर्वीच 'या' राशींना लागणार लॉटरी

Shukra Mangal Yuti: ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, प्रेम यांचा सुखांचा कारक मानला जातो. तर मंगळ हा ऊर्जा, साहस आणि भूमीचा कारक आहे. १८ वर्षांनंतर होणारी ही दुर्मिळ युती काही राशींसाठी अत्यंत धनदायक आणि भाग्याची ठरू शकते, विशेषतः दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणापूर्वी.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, शुक्र ग्रहाला भौतिक सुख, ऐश्वर्य, वैभव, विलासिता यांचं कारक मानलं जातं. तर मंगल ग्रह संपत्ती, क्रोध, रक्त, साहस, पराक्रम आणि शौर्य यांचा कारक आहे. या दोन ग्रहांचा संयोग येत्या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. कारण नोव्हेंबरमध्ये मंगल ग्रह आपली स्वराशि वृश्चिकमध्ये प्रवेश करणार आहे.

पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात मंगळ आपल्या मित्र शुक्र ग्रहाशी युती करणार आहे. या युतीमुळे काही राशींना खास लाभ मिळू शकतो, तसंच धन-संपत्तीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशीच्या लोकांना या संयोगाचा विशेष फायदा होणार आहे ते पाहूयात.

मीन रास (Meen Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी मंगल-शुक्र युती लाभदायक ठरू शकणार आहे. कारण ही युती त्यांच्या राशीच्या भाग्यभावावर होणार आहे. या काळात तुम्हाला नशीबाचा साथ मिळू शकणार आहे. देश-विदेश प्रवासाची संधी मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्व गोष्टी मनाजोग्या घडणार आहेत.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी ही युति आर्थिक लाभ देणारी ठरू शकणार आहे. कारण ही युति त्यांच्याच्या लाभाच्या स्थानावर होणार आहे. कमाईत मोठी वाढ होणार आहे. व्यवसायात मोठ्या करारांमुळे फायदा मिळणार आहे. तुम्हाला शेअर बाजारातून चांगला पैसा हाती येणार आहे.

वृश्चिक राशि (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्र-मंगल युती अनुकूल ठरू शकणार आहे. कारण ही युती लग्न भावावर होणार आहे. जीवनसाथीसोबतच्या नात्यात अधिक गोडवा येणार आहे. नातं अधिक मधुर राहील आणि त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी विवाहाची संधी मिळू शकते. अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे आणि दीर्घकाळ टिकलेल्या आर्थिक अडचणी दूर होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, दवाखाने मागे लागतील; 5 राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष खबरदारी

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

यात्रीगण कृपया ध्यान दे! देशभरात एअर इंडियाचं सर्व्हर डाउन; दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का; ३ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT