
सप्ताहात होणारा शनी-मंगळ योग मोठे खर्च करणारा राहील. पोटाचे विकार संभवतात. धार्मिक विधी, देवदर्शन होईल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग राहील.
कोर्ट-कचेरी, वादविवादापासून दूर राहावे, भागीदारीच्या व्यवसायात कटकटी संभवतात. मात्र, वारसा हक्कातून मोठा लाभहोईल. कमी श्रमातून मोठे लाभ होतील. शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान संभवते.
वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता राहील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. घर, मालमत्तेवरून वाद संभवतात. कोर्टकचेरीचे प्रश्न सामंजस्याने सुटतील. भागीदारीतील व्यवसायात फायदा होईल.
परदेशातील नोकरीसाठी प्रयत्नांना यश मिळेल. व्हिसा-पासपोर्टची कामे होतील. मोठे प्रवास, परदेशगमन होईल. मात्र, या काळात वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. भागीदारीमध्ये नुकसान संभवते.
जागा, घर, मालमत्तेच्या व्यवहारात कटकटी संभवतात. आर्थिक व्यवहार जपून करावेत. घर, जागेमध्ये पैसे अडकतील. कुटुंबात कलह होण्याची शक्यता राहील.
सप्ताहात राशीतून होणारा शनी-मंगळ योग आरोग्याशी संबंधित चिंता वाढविणारा राहील. जोडीदाराशी खटके उडतील. मात्र, घरी धार्मिक विधी होतील. मोठ्या व्यक्तीचा पाहुणचार होईल.
सप्ताहात कौटुंबिक कलह संभवतो. मोठे खर्च झाल्याने आर्थिक ताण वाढेल. कर्जाच्या कामात अडथळे येतील. प्रवासात किमती वस्तूंची काळजी घ्यावी, चोरांपासून सावध राहावे. खरेदी-विक्रीमध्ये नुकसान संभवते.
सप्ताहात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मित्र-सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. वसुली, येणे लांबणीवर पडेल. आर्थिक व्यवहार कटकटीचे होतील. मोठे लाभहोतील. पेन्शन, विमा यांतून लाभ होईल.
वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. महत्त्वाच्या कामात अडथळे विलंब संभवतात. मात्र, तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायाची संधी मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल.
येणी वसूल होतील. मात्र,वादविवादातून मोठी कामे होतील. मोठे प्रवास कराल. व्हिसा-पासपोर्टची कामे होतील. नोकरीत चांगले बदल होतील. हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल.
नवीन व्यवसायासाठी प्रयत्न होतील. नोकरीमध्ये खंड पडेल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कामामध्ये दगदग वाढेल. मात्र, मित्र, सहकारी यांची मदत होईल. शेअर्ससारख्या व्यवसायात दिलासा मिळेल.
नोकरी व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहील. वरिष्ठ कामावर खूष होतील. घरात धार्मिक कार्य होतील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. घर, जागा वाहन यांची खरेदी होईल. समज-गैरसमज संभवतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.