Maha Shivratri 2025 Lucky Zodiac saam tv
राशिभविष्य

Maha Shivratri 2025: महाशिवरात्रीला बनणार विशेष योग! 'या' राशींवर शंकराची कृपा, तिजोरीत भरपूर पैसा येण्याची शक्यता

Maha Shivratri 2025 Lucky Zodiac: वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून यावेळी महाशिवरात्री काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. यावर्षी महाशिवरात्री बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल.

Surabhi Jayashree Jagdish

सनातन धर्मात महाशिवरात्री सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. हा सण महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव यांचं लग्न माता पार्वतीशी झालं होतं अशी, पौराणिक मान्यता आहे. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून यावेळी महाशिवरात्री काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. यावर्षी महाशिवरात्री बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल.

असं म्हटलं जातं की, महाशिवरात्री ही भगवान शिवाची उपासना करण्यासाठी सर्वात मोठी रात्र आहे. या दिवशी भक्त उपवास ठेवतात आणि योग्य पद्धतीने भगवान शिवाची पूजा करतात.

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, या वर्षीची महाशिवरात्री खूप खास आहे. या दिवशी श्रावण नक्षत्र आणि परिघ योगाचा अद्भुत संयोग होणार आहे. यावेळी महाशिवरात्री काही राशींच्या व्यक्तींसाठी फार खास असणार आहे. यावेळी या लोकांना चांगली बातमी मिळणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मेष रास

यंदाची महाशिवरात्री मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास आहे. या दिवसापासून आर्थिक परिस्थिती सुधारू शकणार आहे. या राशींना विशेष नफा मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढीची आनंदाची बातमी मिळू शकते.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री फायदेशीर मानली जातेय. नोकरीशी संबंधित कामात विशेष लाभ मिळतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांची आर्थिक प्रगती होणार आहे. पैशाशी संबंधित कोणतीही मोठी योजना प्रत्यक्षात येईल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस महाशिवरात्रीपासून सुरू होणार आहेत. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT