Mahalaxmi Rajyog saam tv
राशिभविष्य

Mahalaxmi Rajyog: यंदाची दिवाळी होणार धमाकेदार, १०० वर्षांनी बनणार महालक्ष्मी राजयोग; 3 राशींना बोनससह मिळणार पैसा

Mahalakshmi Rajyog on Diwali: यावर्षीची दिवाळी अनेक राशींसाठी खूप खास असणार आहे. कारण तब्बल १०० वर्षांच्यानंतर यंदा लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर एक अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी असा 'महालक्ष्मी राजयोग' तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार ग्रह हे ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. आता दिवाळीचा सण जवळ आला असून या काळात देखील अनेक ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. दिवाळीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. यंदा कार्तिक अमावस्या 20 ऑक्टोबर दुपारी 3:44 पासून सुरू होऊन 21 ऑक्टोबर संध्याकाळी 5:54 पर्यंत राहणार आहे.

यावेळी जी लोकं प्रदोषकाळाला अधिक महत्त्व देतात ते 20 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करतील. तर जे लोक सूर्योदयाच्या तिथीला प्राधान्य देतात ते 21 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करतील. मात्र ग्रहांच्या स्थितीनुसार, 21 ऑक्टोबरला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार असून तिथे आधीच मंगळ उपस्थित आहे. त्यामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

दिवाळीच्या काळात तयार होणारा हा महालक्ष्मी योग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असणार आहे. हा योग काही राशींसाठी भाग्यवृद्धी, अचानक धनलाभ आणि यशाची दारं उघडणारा ठरू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

कन्या राशी

कन्या राशीसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. कारण हा योग त्यांच्या धनस्थान आणि वाणी स्थानावर तयार होतो. या काळात वारंवार अनपेक्षित प्रकारे पैसा मिळण्याची शक्यता राहणार आहे. या काळात गुंतवणूक, शेअर बाजार किंवा जुन्या योजनांमधून अचानक फायदा होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे कमाई वाढेल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होणार आहेत.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग कर्मभावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. कामकाजात यश, करिअरमध्ये वाढ आणि महत्वाच्या पदांवर बढती मिळण्याचे योग तयार होणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगलं फळ मिळणार आहे. अचानक धनलाभाचे योग तयार होणार आहेत.

कर्क राशी

कर्क राशीसाठी हा राजयोग त्यांच्या गोचर कुंडलीतील चतुर्थ स्थानावर तयार होणार आहे. यावेळी घर, जमीन किंवा वाहन खरेदीची संधी मिळू शकणार आहे. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळणार आहे. नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढ होऊ शकणार आहे. ज्यांनी खूप दिवस मेहनत केली आहे त्यांना आता योग्य फळ मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर आज तोडगा निघणार?

Shukra Nakshatra Gochar: उद्या शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, या राशी जगणार ऐशो आरामात आयुष्य

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

Nagpur : हिवाळ्यात नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापणार, विरोधक सरकारला घेरणार, कोणते मुद्दे गाजणार?

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT