Akshaya Tritiya 2025 saam tv
राशिभविष्य

Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेला २ बनणार राजयोग! वृषभ, धनु आणि कुंभ राशींवर बरसणार पैसा

Akshaya Tritiya 2025: एप्रिल महिन्याच्या अखेरीस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी अक्षय तृतीया आहे. या दिवशी दोन राजयोगांची निर्मिती होणार असून काही राशींना यावेळी चांगला लाभ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एप्रिल महिना हा ग्रहांच्या दृष्टीने फार लाभदायक मानला गेलाय. या महिन्यात अनेक ग्रहांनी त्यांच्या राशीमध्ये बदल केले आहेत. या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. याशिवाय या दिवशी गजकेसरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे.

या दोन राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काही राशींना यावेळी चांगली संपत्ती मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

गजकेसरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. मालव्य राजयोग उत्पन्न आणि लाभ स्थानावर तयार होतोय. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. पैसै कमावण्याचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.

धनु रास

गजकेसरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. चंद्र आणि गुरूची युती या राशींना पैसा मिळवून देणार आहे. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळण्याची संधी मिळू शकणार आहे. अविवाहित लोकांसाठी लग्नाच्या चांगल्या शक्यता आहेत.

कुंभ रास

या राशींच्या व्यक्तींना गजकेसरी आणि मालव्य राजयोगाचा चांगलाच फायदा होणार आहे. यावेळी तुम्हाला गजकेसरी राजयोगामुळे आर्थिक लाभ होणार आहे. मालव्य राजयोग तुमच्या राशीच्या धन स्थानावर असणार आहे. पैसे कमावण्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT