राशिभविष्य

नोव्हेंबरमध्ये शश, नीचभंग यांच्यासह अनेक राजयोग होणार तयार; करियर-व्यवसायाच्या भरभराटीसह 'या' राशी होणार मालामाल

November 2024 Lucky Zodiac Sign: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे. या काळात या सर्व राजयोगांचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

आज धनत्रयोदशी असून दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, दिवाळीत नोव्हेंबर महिना फार खास जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे.

दुसरीकडे, या महिन्यात अनेक प्रमुख ग्रह त्यांची राशी बदलणार असून यांचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. या महिन्यात शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहेत. यासोबतच शनीची मार्गी होणार आहे. त्याचप्रमाणे सूर्य नीच राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.

नोव्हेंबरमध्ये बुध वृश्चिक राशीत अस्त होणार आहे. तसंच नोव्हेंबर महिन्यात शश राजयोगाव्यतिरिक्त नीचभंग, नवपंचम राजयोग, धनलक्ष्मी राजयोग, लक्ष्मी नारायण राजयोग, बुद्धादित्य राजयोग तयार होणार आहेत. या काळात या सर्व राजयोगांचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप खास असणार आहे. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणं फायदेशीर ठरू शकणार आहे. हा महिना विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला असणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप खास असणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येऊ शकणार आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं भरभरून कौतुक होणार आहे.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप खास असणार आहे. तुमच्या आयुष्यातील समस्या संपुष्टात येऊ शकतात. तुमचं आरोग्य चांगले राहील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या कृपेने तुमच्या जीवनात अनेक मोठे पण चांगले बदल होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025: नवरात्रीमध्ये घरी आणा या गोष्टी, माता लक्ष्मीच्या कृपेने होईल लाभ

Maharashtra Live News Update: बंजारा समाजाच्या मोर्चाला मराठा समाजाचा पाठिंबा

Beed Flood: बीडमध्ये महापूर!, 70 पेक्षा जास्त गावकऱ्यांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू, पाहा व्हिडिओ

Orange vs Amla: वजन कमी करण्यासाठी संत्री की आवळा, काय आहे योग्य?

Hindi Marathi Controversy : मराठी बोलायची सक्ती आहे का?, डोंबिवलीमध्ये परप्रांतियाची मुजोरी,मराठी माणसालाच उलट सवाल, मनसेनं शिकवला धडा

SCROLL FOR NEXT