Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog: राहू-मंगळाने तयार केला नवपंचम राजयोग; 'या' राशी होणार मालामाल, नशीबही चमकणार

Navpancham Rajyog: राहूच्या आशीर्वादामुळे अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. नवपंचम योग अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे.

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. यामध्ये ग्रहांच्या स्थिती बदलामुळे खास योग देखील तयार होतात. राहू हा एक असा ग्रह आहे जो 9 ग्रहांमध्ये सर्वात शक्तिशाली मानला जातो. राहूला मायावी ग्रह देखील म्हटलं जातं. राहूच्या आशीर्वादामुळे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार 20 ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला असून मंगळ कर्क राशीत गेल्यामुळे मीन राशीत असलेल्या राहूसोबत येऊन नवपंचम राजयोग तयार झाला आहे. नवपंचम योग अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे, तर काहींना या काळात फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी पैशाच्या घरात मंगळाचं भ्रमण आहे . यामुळे नोकरदार लोकांच्या नोकरीत मोठे बदल होऊ शकतात. या काळात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकणार आहे. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडू शकणार आहे.

कन्या रास

राहू सातव्या भावात आणि मंगळ अकराव्या भावात भ्रमण करतोय. राहू आपल्या मित्र शनीच्या नक्षत्रात असल्याने मंगळाच्या बरोबरीने नवपंचम योग तयार होणार आहे. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकणार आहेत. व्यावसायिक मार्गाने पैसे कमवत असाल तर जास्त प्रमाणात पैसे मिळतील. व्यावसायिक भागीदारासोबत सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT